जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चिमुकल्यांनी वाचवले आईचे प्राण, Video सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

चिमुकल्यांनी वाचवले आईचे प्राण, Video सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सीसीटीव्ही व्हिडिओ आहे. यामध्ये एक महिला दरवाजाजवळ शिडी लावून वर चढून काही तरी काम करत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 25 डिसेंबर : लहान मुलांसंबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असेल, जे कधी मनोरंजक तर कधी विचार करायला लावणारे असतात. लहान मुलांच्या शैर्याचे देखील अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल. पण सध्या एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही त्याचं कौतुक केल्याशिवाय राहाणार नाही. या व्हिडीओमधील लहान मुलाने आपल्या शौर्याने आणि बुद्धीने आपल्या आईचे प्राण वाचवले आहे. हे ही पाहा : Video : आधी विजेच्या तारेवर चढला आणि… प्रेयसीसाठी तरुणाचं धक्कादायक पाऊल छोट्या धाडसी माणसाने आपले सर्वस्व दिले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘‘आई गॅरेजचा दरवाजा दुरुस्त करत असताना तिची शिडी पडली. आईला वर लटकलेले पाहून धाडसी चिमुरड्याने जिवाचे रान करून तिला मदत केली. या लहान मुलाच्या शहाणपणाची आणि धैर्याची प्रशंसा करता येणार नाही.’’ व्हायरल झालेला हा व्हिडीओ सीसीटीव्ही व्हिडिओ आहे. यामध्ये एक महिला दरवाजाजवळ शिडी लावून वर चढून काही तरी काम करत आहे. दरम्यान, शिडी खाली पडली, तेव्हा तिने वर असलेल्या लाकडाच्या खांबाला पकडले आणि ती तेथेच लटकू लागली. हे सगळं घडलं तेव्हा तिचा मुलगा तेथेच उभा होता. त्याने हे पाहिलं आणि तो आपल्या आईला वाचवण्यासाठी धावला. त्याच्या वजना ऐवढ्या शिडीला त्याने उचलण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यामध्ये यशस्वी देखील झाला. ज्यामुळे तो त्याच्या आईला वाचवू शकला.

जाहिरात

या चिमुकल्याची आई ज्या उंचीवर लटकली होती त्या उंचीवरुन ती खाली पडली असती तर काहीही झालं असतं, यामुळे तिचे प्राण जाऊ शकले असते किंवा मग ती गंभीर जखमी देखील होऊ शकली असती. पण तिच्या मुलामुळे तिच्यावरील संकट टळले.

News18लोकमत
News18लोकमत

हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेक युजर्सनी या चिमुरड्याची स्तुती केली आहे. तर अनेकांना त्याने लहान वयात दाखवलेल्या या समजसपणाचे आप्रुप वाटेल आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात