मुंबई 24 नोव्हेंबर : असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं मान्य असतं आणि यासाठी लोक देखील काहीही करण्याची तयारी दाखवतात. मग अगदी स्वत:च्या प्राणाची पर्वा देखील करत नाहीत. तुम्ही असे प्रेमवेडे आशिक नक्कीच पाहिले असतील जे आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीसाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. असाच एका प्रियकराचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. पण या व्हिडीओमधील व्यक्तीला त्याचं काही नाही. हे ही पाहा : Video : हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात; कित्येक मीटर उंच उडाली व्यक्ती आणि… या व्हिडीओमधील व्यक्ती विजेच्या धोकादायक खांब्यावर चढला आणि तेथून पूजाला ‘आय लव्ह यू’ म्हणत आहे…. या प्रेम वेड्या आशिकनं हे सगळं करताना आपल्या जीवाची पर्वा अजिबातच केली नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये ही व्यक्ती ज्या खांब्यावर चढली आहे. तो खांबा खूप उंचावर आहे. शिवाय याच्या दोन्ही बाजूंनी धोकादायक तारा देखील आहेत. तसेच या व्यक्तीच्या हातात मोबाईल दिसत आहे आणि ही व्यक्ती फोनवर ओरडून पूजाला सांगत आहे की त्याचं तिच्यावर प्रेम आहे. तसेच तो तिच्यासाठी काहीही करु शकतो.
सध्या या व्हिडीओने सोशल मीडियावर जोर धरला आहे. लोक येथे मजेदार कमेंट्स करत आहेत. पण असं असलं तरी देखील हा प्रकार फारच धोकादायक आहे.
या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की भाऊ, याने शोलेच्या धर्मेंद्रलाही मागे सोडले आहे. तो फक्त टाकीवर बसवले होते, हा एक विजेच्या खांबावर चढला आहे. त्याचबरोबर काही युजर्स आपली नाराजीही व्यक्त करत आहेत आणि जीव धोक्यात घालणे योग्य नसल्याचे सांगत आहेत.