मुंबई 9 सप्टेंबर : सोशल मीडियावरील व्हिडीओ किंवा फोटो आपल्याला नेहमीच आश्चर्यचकीत करत असतात. तर काही असे देखील व्हिडीओ असतात जे आपलं मनोरंजन करतात. पण सध्या एक असा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून सगळेच लोक घाबरले आहेत. हो कारण येथे चक्कं पाण्यामध्ये आगीचा भोवरा तयार झाला आहे. पाण्यात आग कशी लागू शकते आणि हे नक्की आहे तरी काय? या विचाराने लोक थक्कं झाले आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी याबद्दल चर्चा सुरू केली. समृद्रात किंवा पाण्यात आग लागणे हे जग संपण्याच्या दिशेने काही संकेत आहेत का? असा देखील लोकांकडून प्रश्न उपस्थीत केला जात आहे.
मात्र, वास्तव काही वेगळेच आहे. ही आग मेक्सिकोच्या आखाताजवळ लागली आहे. जी पाण्याखालील पाइपलाइनमधून गॅस गळतीमुळे लागली आहे.
हे वाचा : Viral video : महिलेच्या कानात शिरला साप, पिवळ्या सापाचा व्हिडीओ पाहून सर्वच हैराण
हा व्हिडीओ तसा फार जूना आहे. रिपोर्टप्रमाणे ही आग गेल्यावर्षी जुलैमध्ये लागली होती. परंतू आता पुन्हा या व्हिडीओने सोशल मीडियावर जोर धरला आहे.
या व्हिडीओवर विश्वास ठेवणे कठीण आहे, परंतु तो खरा आहे. या व्हिडीओमध्ये वितळलेल्या लावासारख्या पाण्यातून चमकदार केशरी ज्वाला बाहेर पडताना दिसत आहे. तसेच येथे आग विझवण्यासाठी यागीच्या वर्तुळाभोवती चार बोटी दिसत आहेत. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओने Reddit वर शेकडो अपव्होट्स जमा केले आहेत.
मागील अहवालानुसार, ऑफशोअर प्लॅटफॉर्म कॉम्प्लेक्सशी जोडलेली पाण्याखालील तेलाची पाइपलाइन तुटल्याने ही घटना घडली. मेक्सिकोची सरकारी मालकीची पेमेक्स पेट्रोल कंपनी पेमेक्सने सांगितले की, ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी पाच तासांपेक्षा जास्त वेळ लागला.
Pemex ने असेही नोंदवले की मुसळधार पावसासह विजेच्या वादळाने पाइपलाइनच्या काही उपकरणांवर परिणाम झाला, ज्यामुळे पाइपलाइनमध्ये गॅस गळती झाली. जेव्हा हा गॅस पाण्यात मिसळून पृष्ठभागावर आला तेव्हा त्यावर विज पडल्यामुळे आग लागली. आग आटोक्यात आणल्यानंतर, कंपनीने सांगितले की सामान्य ऑपरेटिंग परिस्थिती पुन्हा सुरू झाली आहे आणि घटनेदरम्यान पर्यावरणाचे नुकसान झाले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.