मुंबई 7 सप्टेंबर : कधीकधी सोशल मीडियावर आपल्यासमोर अशा काही घटना येतात, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. कारण त्या अगदी असामान्य गोष्टी असतात. याच संबंधीत एका व्हिडीओने सोशल मीडियावर अगदी धुमाकूळ घातला आहे. ज्यामध्ये एका महिलेच्या कानात चक्क साप गेला आहे. हो हे खरं आहे. हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी, या व्हिडीओमुळे लोकांना हे कळलं आहे की, साप हा माणसाच्या कानात देखील जाऊ शकतो. सोशल मीडियावर या धक्कादायक व्हिडीओने लोकांची झोपच उडाली आहे, ज्यामुळे लोक आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रांना सतर्क करण्यासाठी हा व्हिडीओ शेअर करत आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे मुलीला जेव्हा आपल्या कानात काहीतरी शिरलं याबद्दल कळलं तसंच, ती लगेच डॉक्टरांकडे गेले. ज्यानंतर त्यांना दिसलं की, या तरुणीच्या कानात साप गेला आहे. ज्यानंतर कदाचित डॉक्टर देखील घाबरले असावेत. परंतू त्यांनी धिरानं काम केलं आणि या तरुणीच्या कानातून साप काढण्यासाठी मदत केली. हे वाचा : Video : दारुच्या दुकानात बसून पिण्यासाठी चोरांनी लढवली अजब शक्कल, ते आत तर गेले पण… व्हिडीओमध्ये डॉक्टर मुलीला बसवून सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरांनी हातात ग्लोज घातले आणि लहान चिमट्याने सापाला बाहेर काढलं. ही घटना नक्की कुठली आहे हे कळू शकलेलं नाही. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. कारण कानात घुसलेला छोटा साप खूपच धोकादायक दिसत होता. कारण पिवळ्या रंगाचा आणि अंगावर चट्टे असलेला हा छोटा साप, तिच्या कानातून हळूच आपलं तोंड बाहेर काढत आहे.
हे वाचा : Video : लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याने घेतला मुलाचा चावा, मालकिणीची प्रतिक्रिया पाहून नेटीझन्सकडून संताप व्यक्त काही सेकंदांचा हा व्हीडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडीओ shilparoy9933 या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.