मुंबई 7 सप्टेंबर : आपण शाळेत तसेच सिनेमागृहात राष्ट्रगीत म्हणतो. आपल्याला माहित आहे की हे भारताचं राष्ट्रगीत आहे आणि ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे. परंतू तुम्ही कधी त्याचा नेमका अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला? तुम्हाला माहितीय आपल्या राष्ट्रगीतामध्ये संपूर्ण भारत देश समावलेला आहे. फार कमी लोकांनी हे ठावूक असेल की ‘जन गण मन’ या गीतामध्ये संपूर्ण भारताचा समावेश आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने आनेकांची मन जिंकली आहे. या व्हिडीओमध्ये एका शिक्षकाने मुलांना आपल्या राष्ट्रगीताचा शब्दशहा अर्थ सांगितला आहे. जो जाणून घेतल्यावर तुम्हाला ही आश्चर्य वाटेल. लहानपणापासून जे गीत आपण म्हणत आहोत, त्याचा अर्थ जाणून घेतल्यावर ते गाणं म्हणण्याच जी मजा आहे, ती दुसरी कशातच नाही. चला आपल्या राष्ट्रगीताचा अर्थ समजून घेऊ. it_nick.8182 नावाच्या एका इंस्टाग्राम यूजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओची सुरुवात शिक्षकाने नकाशाकडे दाखवून केली. ज्यामध्ये तो नकाशात कठच्या भागात काय आहे हे दाखवत आहे. ते नकाशावर काही मुद्दे लिहितात. राष्ट्रगीतामध्ये भारताच्या नकाशाचा उल्लेख कसा करण्यात आला आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करतात. हे वाचा :Knowledge News : तुम्हाला माहितीय Ambulance वर का लिहिली जाते उलटी स्पेलिंग? या मागचं कारण फारच रंजक खान सर म्हणून ओळखल्या जाणार्या शिक्षकाने त्यांच्या वर्गात भारताचा नकाशा तपशीलवार समजावून सांगितला. त्यांनी आधी नकाशावर हिमालय, नंतर मध्य प्रदेशातील विंध्याचल, यूपीच्या दोन प्रमुख नद्या गंगा आणि यमुना, दक्षिण भारतातील द्रविड, महाराष्ट्र, गुजरात, सिंध आणि पंजाब याबद्दल सांगितले. यानंतर त्यांनी भारताच्या राष्ट्रगीताच्या काही ओळी सांगितल्या. जे या भारताच्या नकाशाचं वर्णन करतात.
हे वाचा : फोटो साधा वाटत असला तरी तो साधा नाही… यात लपलीय मांजर, तिला शोधण्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार का? हा व्हिडीओ लोकांना फार आवडला आहे. शेअर केल्यापासून, व्हिडीओ 2 कोटीहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच याला लोकांनी भरभरुन लाईक देखील केलं आहे.