• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मुलानं आईला सुनावली आपल्या पुनर्जन्माची कहाणी; सांगितला अपघातात झालेल्या मृत्यूचा थरारक अनुभव

मुलानं आईला सुनावली आपल्या पुनर्जन्माची कहाणी; सांगितला अपघातात झालेल्या मृत्यूचा थरारक अनुभव

एका महिलेनं सोशल मीडियावर (Social Media) आपल्यासोबत घडलेली अजब घटना (Weird Incident) शेअर केली आहे. महिलेचं असं म्हणणं आहे, की तिच्या मुलाला आपल्या मागील जन्मातील सर्व गोष्टी लक्षात आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 02 ऑक्टोबर : तुम्ही पुनर्जन्माच्या अनेक गोष्टी (Rebirth Stories) ऐकल्या असतील. अनेक चित्रपटांमध्ये दाखवलं जातं, की कशा पद्धतीनं माणसाला आपल्या मागच्या जन्मातील गोष्टी लक्षात राहतात. मात्र, अनेकांना या गोष्टींवर विश्वास बसत नाही. मात्र, अनेक लोक असेही आहेत, ज्यांचा या गोष्टींवर विश्वास आहे. नुकतंच एका महिलेनं सोशल मीडियावर (Social Media) आपल्यासोबत घडलेली अजब घटना (Weird Incident) शेअर केली आहे. महिलेचं असं म्हणणं आहे, की तिच्या मुलाला आपल्या मागील जन्मातील सर्व गोष्टी लक्षात आहेत. सोशल मीडियावरचा 1 नंबर ट्रेण्ड झाली ही आईस्क्रीम इडली! तुमचं काय म्हणणं आहे यावर महिलेच्या म्हणण्यानुसार मागील जन्मात तिच्या मुलाचा रोड अपघातात (Road Accident) मृत्यू झाला होता. ही गोष्ट स्वतः तिच्या मुलानेच तिला सांगितली आहे. टिकटॉकवर एना नावाच्या महिलेनं @ana_mana_pia नावानं अकाऊंट बनवलं आहे. यावरच तिनं आपल्या मुलासोबत झालेली बातचीत शेअर केली. महिला आणि तिच्या मुलाचं कारमध्ये बोलणं झालं. 10 मिनिटं झालेल्या या बोलण्यात मुलानं सांगितलं, की मागील जन्मात त्याचा मृत्यू रस्ते अपघातात झाला होता. त्यावेळी तो लहान होता. त्या जन्मात झालेल्या मृत्यूनंतर आता तो या महिलेचा मुलगा बनून जगात परत आला आहे. एनानं सांगितलं, की आपल्या मुलासोबत झालेल्या बोलण्यानंतर तिच्या मनात भीती निर्माण झाली आहे. ज्या पद्धतीनं तिचा मुलगा बोलत होता, त्यावरुन असं वाटतं होतं की ही संपूर्ण घटना त्यानं आपल्या डोळ्यांनी पाहिली आहे. त्याचं बोलणं आणि हावभाव दोन्ही भीतीदायक होतं. त्यानं अगदी आरामात आपल्या आईला मागील जन्मातील गोष्टी सांगितल्या. यात त्याचं वय आणि मृत्यू दोन्हीचा समावेश होता. विमानतळावर पुन्हा घुसलं माकड, फूड प्लाझामध्ये घातला धुमाकूळ; पाहा VIDEO एनानं आपल्या मुलासोबत झालेली बातचीत रेकॉर्ड केली. तिनं याचा व्हिडिओ आपल्या टिकटॉक अकाऊंटवर शेअर केला. व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखाहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ हजारोंनी लाईक केला असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी असेच अनुभव शेअर केले आहेत. काहींनी लिहिलं, की खरंच पुनर्जन्म होतो. अनेकदा लोकांना आपल्या मागच्या जन्मातील गोष्टी आठवतात. हे कमी प्रमाणात घडतं मात्र हे शक्य आहे, असं लोकांचं म्हणणं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: