नवी दिल्ली 02 ऑक्टोबर : घरात आपल्या पत्नी किंवा पतीसोबत (Husband and Wife) सतत राहून तुम्हाला त्यांच्या बऱ्याच सवयी आणि गोष्टी माहिती असतात. इतकंच नाही तर त्यांना काय आवडतं, काय आवडतं नाही आणि त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, याचा अंदाजही आपण लावू शकतो. अनेकदा तर समोरचा काहीही बोलला नाही तरीही आपल्याला सगळं समजतं.
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Husband Wife Jokes Video) असंच काही पाहायला मिळतं. यात दिसतं, की एका पत्नीनं आपल्या पतीच्या मनातील ती गोष्ट बरोबर काढून घेतली, जी तो पत्नीला कधीच सांगू इच्छित नव्हता.
बंदिस्त होण्याआधी कोब्राने घेतला बदला, सर्पमित्रालाच दिला मृत्यू; थरारक VIDEO
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Video Viral on Social Media) दिसतं, की पती रूममध्ये बसून आपलं काहीतरी काम करत असतो. त्याच्या शेजारीच त्याची पत्नीही बसलेली असते. इतक्यात अचानक पत्नीच्या मनात एक सवाल उपस्थित होतो. हा प्रश्न विचारण्यासाठी ती अजब पद्धतीचा वापर करते. पत्नी म्हणते, ऐका..माझ्या एका प्रश्नाचं हा किंवा नाही यात उत्तर द्या. आपल्या कामात मग्न असलेल्या पतीला या गोष्टीचा अंदाजच येत नाही की पत्नी काय विचारणार आहे. पती म्हणतो, हा बोल ना.
View this post on Instagram
यानंतर पत्नीनं आपल्या पतीकडे पाहून विचारलं, की तू शेजारणीवर लाईन मारणं बंद केलं? हे ऐकून लगेचच पती उत्तर देतो, नाही, हो. हे उत्तर ऐकून पत्नीला अतिशय राग येतो. कारण पतीनं आधी नाही म्हटलं आणि नंतर हा म्हटलं यामुळे दोन्ही उत्तरात तो चांगलाच अडकला.
विमानतळावर पुन्हा घुसलं माकड, फूड प्लाझामध्ये घातला धुमाकूळ; पाहा VIDEO
हा मजेशीर व्हिडिओ (Funny Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर पूजा सुराना नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Wife and husband