जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लग्नात डान्स करणाऱ्या वऱ्हाड्यांच्या पाया खालची जमीनच सरकली, Video पाहून बसेल धक्का

लग्नात डान्स करणाऱ्या वऱ्हाड्यांच्या पाया खालची जमीनच सरकली, Video पाहून बसेल धक्का

प्रतिकात्मक व्हिडीओ

प्रतिकात्मक व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ तसा जुना आहे. पण आता लग्नसमारंभात तो पुन्हा ट्रेंड होऊ लागला आहे, जो फारच धोकादायक आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 20 डिसेंबर : लग्न म्हटलं की डान्स तर आलाच. नाच-गाण्याशिवाय कोणतंही लग्न अपूरंच वाटतं किंवा त्याच्याशिवाय मजा येतच नाही. सध्या लग्नाचा सिजन सुरु आहे आणि तुम्हाला देखील तुमच्या आजूबाजूला अनेक लग्न होत असताना दिसतील किंवा ओळखीतले लोक लग्न करत असतील. यासंदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत असतात. त्यामुळे तुम्ही एकदा का सोशल मीडिया ओपन केला तर तुम्हाला अनेक व्हिडीओ येथे पाहायला मिळतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हिडीओ तसा जुना आहे. पण आता लग्नसमारंभात तो पुन्हा ट्रेंड होऊ लागला आहे. हे ही पाहा : बुल फाइटचा हृदय पिळवटून टाकणारा Video, पाहून बसेल धक्का खरंतर हा व्हिडीओ एका भयानक दुर्घटनेचा आहे. लोक डान्स फ्लोअरवर नाचदाताना तो डान्स फ्लोअर टूटला आणि खाली कोसळला. ही घटना जेव्हा घडली तेव्हा त्या फ्लोअरवर २० जणांपेक्षा जास्त लोक डान्स करत होते. या घडनेमुळे अनेक लोक जखमी झाले आहे. या व्हायरल व्हिडीओ ने एकच खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की लग्नाला आलेले पाहुणे खूप आनंदी आहेत आणि प्रत्येकजण आनंद घेण्यासाठी गाण्यावर डान्स करत होता. नाचताना प्रत्येकजण उड्या मारताना दिसत होता. मात्र, त्यांच्यासोबत काही सेकंदात अनुचित घटना घडणार हे कोणालाच माहीत नसते.

News18लोकमत
News18लोकमत

असे दिसते की लग्न एका मजल्याच्या इमारतीत आयोजित केले गेले होते, जेथे जागा लहान होती परंतु लोक जास्त होते. नशीबाने ही जमीन खचल्यानंतर सर्वजण फक्त काही फूटच खाली पडले आणि तो ती जमीन सरळ खाली कोसळली, ज्यामुळे लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे, पण हे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले.

जाहिरात

oops_sorry30 नावाच्या अकाऊंटने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी भरभरु कमेंट्स आणि लाईक्स केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात