जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बुल फाइटचा हृदय पिळवटून टाकणारा Video, पाहून बसेल धक्का

बुल फाइटचा हृदय पिळवटून टाकणारा Video, पाहून बसेल धक्का

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

धोकादायक स्टंट करताना जखमी होतात. तर काही लोकांना यामुळे आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 18 डिसेंबर : सोशल मीडियावर दररोज काही न काही आश्चर्यकारक व्हिडीओ येत असतात. जे यूजर्सच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासोबतच सर्वांना आश्चर्यचकित करतात. तसेच येथे आपल्याला स्टंटबाजीचे देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. जे फारच धोकादायक असतात. खरंतर काही तरुण मंडळी नेहमीच स्टंटबाजी करण्यासाठी उत्सुक असतात. अशावेळी ते आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाहीत. आपण काहीही करु शकतो आणि अगदी धोकादायक आव्हान देखील स्वीकारु शकतो असा त्यांचा विचार असतो. पण परिणामी अनेक लोक जखमी होतात. तर काही लोकांना यामुळे आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. हे ही पाहा : Viral Video : चोराचा शहाणपणा अंगाशी आला; त्याच्या कल्पनेपेक्षा हुशार निघाला दुकानदार सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. हा व्हिडीओ बूल फाईटचा आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती रागावलेल्या बैलासमोर जाऊन उभी राहाते आणि परिणामी स्वत:चं नुकसान करुन बसते. या व्हिडीओमधील व्यक्तीसोबत इतकी भयानक घटना घडते की कदाचित तुम्ही ते पाहू देखील शकणार नाही.

जाहिरात

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बैलाच्या झुंज दरम्यान काही व्यक्ती बैलासमोर लाल कपडा धरुन उभी आहेत, तर काही वेडे लोक संतप्त बैलाच्या पाठीवर बसून त्यावर स्वार होताना दिसतात. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बैलासमोर झोपली असते, तेव्हा बैल धावत येतो आणि या व्यक्तीवर हल्ला करतो, एवढंच काय तर तो या  व्यक्तीला फरफचत पुढे देखील घेऊन जातो. या हल्ल्यामध्ये बैलाचा शिंग व्यक्तीच्या हातात घुसतात, ज्यामुळे त्याच्या दंडाचा काही भाग रक्तबंबाळ झाला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बैल आपल्या शिंगांच्या सहाय्याने त्या व्यक्तीला लांबपर्यंत खेचतोय. त्यानंतर तो तिला सोडून जातो. ती व्यक्ती वेगाने उठून हात वर करून बाहेर पळताना दिसत आहे. जे पाहून युजर्सचे मन हेलावले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात