बिहार 27 सप्टेंबर : सोशल मीडियावर तुम्ही अनेक चोरीच्या घटना पाहिल्या असतील. खरंतर सोशल मीडियावरील असे व्हिडीओ बऱ्याचदा पाहाण्यासाठी मजेदार वाटतात शिवाय ते लोकांसमोर उदाहरण देखील ठेवतात, ज्यामुळे लोकांना त्यातून शिकता येतं आणि पुढच्यावेळी ते अशा घटनेची शिकार होणार नाहीत. खरंतर चोरी करणारे चोर हे खूप हुशार असतात, ते नेहमीच चोरी करण्याची वेगवेगळी पद्धत शोधून काढतात. हा सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या देखील हे लक्षात येईलच. खरंतर हा चोरी करणारा चोर हा एका बाईकची चोरी करण्याचा प्रयत्न करतो. तो यासाठी वेगवेगळे प्रकार करुन पाहातो, परंतू काहीही केल्या जेव्हा त्याच्याकडून ती बाईक स्टार्ट होत नाही, तेव्हा तो चोरी करण्यासाठी दुसरी शक्कलं लावतो. हे वाचा : ती तरुणासमोर प्रेमानं येऊन उभी राहिली, पण त्यानंतर तिनं जे केलं; ते धक्कादायक, पाहा VIDEO खरंतर बाईक जेव्हा त्याला चोरता येत नाही तेव्हा चोराने रागाच्या भरात असे काही केले, ज्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्ही आधी हा व्हायरल व्हिडीओ पाहा तुम्हाला लक्षात येईल की कसा हा चोर आपल्या हुशारीचा वापर करतो आणि चोरी करतो. या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्ही त्याचं कौतुक करु लागला आणि तुम्हाला त्याच्यावर हसू देखील येईल. दुचाकी चोरण्यात अयशस्वी
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती बाईक शोरूमच्या बाहेर रस्त्यावर पार्क केलेली बाईक चोरण्याच्या इराद्याने येतो. पण जेव्हा तो त्याच्या योजनेत अपयशी ठरतो तेव्हा तो प्लॅन बी फॉलो करू लागतो. हे वाचा : नवरीला न घेताच नवऱ्यानं काढला पळ, चर्चेत आलं बिहारमधलं अजब-गजब Love, पाहा Video दुचाकीच्या भक्कम आणि मजबूत लॉकमुळे चोरट्याला त्याचा लॉक तोडता येत नाही, त्यामुळे चोराची चिडचिड होऊ लागली. अखेर त्याने रागाच्या भरात पेट्रोलची टाकी उखडून टाकली आणि तेथून पळ काढला.
हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. इतकेच नाही तर अनेकांनी व्हिडीओला लाइक आणि शेअर ही केलं आहे.