मुंबई 17 सप्टेंबर : तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला सर्वत्र एकच चित्र दिसेल की, बहुतांश लोक हे आपल्या फोनमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे या लोकांना आपल्या आजूबाजूला काय घडतंय याचं भानच राहात नाही. ज्यामुळे अशा लोकांसोबत अप्रिय घटना ज्यामध्ये चोरी, अपघात यांसारख्या घटना घडतात. बऱ्याचदा लोक आपल्या फोनमध्ये इतके व्यस्त असतात की, त्यांना खाताना, पिताना, चालताना प्रवास करताना मोबाईल हातात लागतो, ज्यामुळे रस्ते ओलांडताना अनेकदा लोकांना अपघातांना सामोर जावं लागलं. तसेच असे काही चोर आहेत, जे लोक फोनमध्ये असल्याचा फायदा घेत त्यांच्या वस्तू चोरतात तर काही वेळा फोन देखील हातातून पळवला जातो.
यासंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ चोरीचा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक तरुणी मोठ्या चतुराईने एका व्यक्तीच्या हातातून फोन पळवते.
खरंतर चोर संधीचीच वाट पाहात असतात की, कधी एखादा निष्काळजी व्यक्ती त्याच्यासमोर येईल आणि त्याला ते टार्गेट करतील. या तरुणीनं देखील तसंच केलं. खरंतर एक तरुण मेट्रोच्या दरवाज्यावर उभा असतो. तेव्हा त्याच्यासमोर एक तरुणी येऊन उभी राहाते. हा तरुण मेट्रोच्या आत उभा असतो, तर ती तरुणी मेट्रोच्या बाहेर असते आणि जसे मेट्रोचे दरवाजे बंद होऊ लागतात. तशीच ही तरुणी हातचलाखी करते आणि या तरुणाच्या हातातून मोबाईल खेचते.
यानंतर मेट्रोचे दरवाजे बंद होतात. ज्यानंतर ही तरुणी मोबाईल घेऊन तेथून पळ काढते. हा व्हिडीओ कुठला आहे हे कळू शकलेलं नाही. परंतू ही घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, ज्याचा व्हिडीओ इंटरनेटवर ट्रेंड होऊ लागला आहे.
Ohh didi 😂😭😂 pic.twitter.com/70eRiCOFmn
— Meme Farmer (@craziestlazy) September 14, 2022
हा व्हिडीओ मिम फॉर्मर नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे, जो लाखो सोशल मीडिया यूजर्सनी पाहिला आहे.
जवळपास 30 सेकंदाच्या या व्हिडीओने नेटकऱ्याच्या संवेदना उडवल्या आहेत. लोक या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत, तर काहीजण यावर आपला अनुभव शेअर करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news, Top trending, Viral news