नवी दिल्ली 27 डिसेंबर : नवीन गायक इंडस्ट्रीमध्ये येताच स्पर्धा आणखीच वाढते. अशात गायकांचं काम केवळ नवनवीन गाणी बनवून चालत नाही तर आपल्या चाहत्यांसाठी निरनिराळे म्यूझिक व्हिडिओही बनवावे लागतात. चाहत्यांचं लक्ष वेधण्यासाठी हे गायक वेगळं काहीतरी करण्याचा नेहमीच प्रय़त्न करतात. मात्र नुकतंच एका गायिकेसोबत म्यूझिक व्हिडिओ शूट (Singer Shocking Music Video) करताना असं काही घडलं, जे पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
दुचाकी घेऊन थेट नदीत गेला तरुण अन्...; फजिती पाहून लावाल डोक्याला हात, VIDEO
21 वर्षाची अमेरिकन सिंगर माइटा हिने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक थक्क करणारा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती सापांसोबत म्यूझिक व्हिडिओ शूट करताना दिसली. ती पांढऱ्या बॅकड्रॉपवर झोपली असून तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिच्या अंगावर आधीपासूनच एक काळ्या रंगाचा साप दिसतो (American Singer Snake Video). मात्र काहीच वेळात हैराण करणारी घटना घडते.
View this post on Instagram
असिस्टंट डायरेक्टर मायटाच्या अंगावर काही वेळातच एक पांढऱ्या रंगाचा साप टाकतो. यानंतर काळा साप भडकतो आणि को मायटावर हल्ला करतो (Snake Bites Singer). यानंतर मायटा लगेचच उठते आणि हा साप पकडून बाजूला टाकते. मात्र तोपर्यंत सापाने तिला चावलेलं असतं. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असताना मला या अडचणींचा सामना करावा लागतो.
Viral होतंय फळांचं अनोखं दुकान, स्वतः मेहनत करा आणि ज्यूस प्या; पाहा VIDEO
काही दिवसांपूर्वीच पोस्ट केला गेलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. मायटाने व्हिडिओचा कमेंट सेक्शन ऑफ केल्यानं लोक यावर प्रतिक्रिया देऊ शकलेले नाहीत मात्र व्हिडिओ अतिशय शॉकिंग आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. सुदैवाने हा साप विषारी नसल्याने मायटाला काहीही गंभीर समस्या आली नाही. तिच्या नंतरच्या पोस्टवर कमेंट करून लोक या सापाच्या व्हिडिओबद्दल बोलत आहेत. अनेकांनी तिला गाण्यात खऱ्या सापांचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Singer, Snake video