जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दुचाकी घेऊन थेट नदीत गेला अन्...; तरुणाची झालेली फजिती पाहून लावाल डोक्याला हात, VIDEO

दुचाकी घेऊन थेट नदीत गेला अन्...; तरुणाची झालेली फजिती पाहून लावाल डोक्याला हात, VIDEO

दुचाकी घेऊन थेट नदीत गेला अन्...; तरुणाची झालेली फजिती पाहून लावाल डोक्याला हात, VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती नदी ओलांडण्यासाठी अशी पद्धत वापरतो की नंतर त्यालाच याचा पश्चाताप होतो. हा व्यक्ती थेट नदीमध्ये आपली गाडी घेऊन जातो

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 27 डिसेंबर : तुम्ही जर सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असाल तर अनेकदा तुम्हाला निरनिराळे मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळत असतील. यातील काही व्हिडिओ खळखळून हसवणारे असतात तर काही हैराण करणारे. सध्या एक अतिशय मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Funny Video Viral) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. Viral होतंय फळांचं अनोखं दुकान, स्वतः मेहनत करा आणि ज्यूस प्या; पाहा VIDEO आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेकदा लोक आपलं काम लवकर व्हावं यासाठी शॉर्ट-कटचा वापर करतात. अनेकदा या शॉर्ट-कटचा (Shortcut) आपल्याला फायदा होतो तर अनेकदा यामुळेच आपण अडचणीत सापडतो. सध्या याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल की शॉर्ट-कट प्रत्येक वेळी यशस्वी ठरतोच असं नाही.

जाहिरात

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती नदी ओलांडण्यासाठी अशी पद्धत वापरतो की नंतर त्यालाच याचा पश्चाताप होतो. हा व्यक्ती थेट नदीमध्ये आपली गाडी घेऊन जातो आणि नदी ओलांडण्याचा प्रयत्न करतो. मात्र याठिकाणची माती अतिशय ओली असल्याने गाडी या मातीत खचताना दिसते. व्हिडिओ पाहून असं वाटतं, जणू या गाडीने जलसमाधी घेतली आहे.

गळ्यात पट्टा बांधून महिलेला आणलं फ्लाईटमध्ये, लोक झाले चकीत; पाहा VIDEO

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ ‘om_491_rider’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत जवळपास ३ लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, हे पाहून मला हसू आवरत नाहीये. तर आणखी एकाने लिहिलं, लोक शॉर्ट-कटच्या नादात काय काय करतील हे सांगता येत नाही. याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात