मराठी बातम्या /बातम्या /Viral /Viral होतंय फळांचं अनोखं दुकान, स्वतः मेहनत करा आणि ज्यूस प्या; पाहा VIDEO

Viral होतंय फळांचं अनोखं दुकान, स्वतः मेहनत करा आणि ज्यूस प्या; पाहा VIDEO

ज्यूस सेंटर ही काही नवी संकल्पना नाही. मात्र एकाने अशा पद्धतीनं हे सेंटर साकारलं आहे ज्याकडं अनेकांचं लक्ष वेधलं जात आहे.

ज्यूस सेंटर ही काही नवी संकल्पना नाही. मात्र एकाने अशा पद्धतीनं हे सेंटर साकारलं आहे ज्याकडं अनेकांचं लक्ष वेधलं जात आहे.

ज्यूस सेंटर ही काही नवी संकल्पना नाही. मात्र एकाने अशा पद्धतीनं हे सेंटर साकारलं आहे ज्याकडं अनेकांचं लक्ष वेधलं जात आहे.

अहमदाबाद, 26 डिसेंबर: सध्या गुजरातमध्ये असणारं एक ज्यूसचं दुकान (Juice Center in Gujrat) सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. आजकाल कुठलाही व्यवसाय चालण्यासाठी त्यात एक प्रकारचं नावीन्य आणण्याची गरज असते. संकल्पनेत असणारं नावीन्यच ग्राहकांचं लक्ष वेधून घेतं आणि त्यानंतरच कुठलाही व्यवसाय चालायला सुरुवात होते. अशा प्रकारच्या अनोख्या संकल्पनांसाठी उद्योजक लाखो रुपये मोजायलाही तयार असतात कारण एखादी संकल्पनाच तो व्यवसाय कितपत झेप घेईल, हे ठरवत असते.

गुजरातमध्ये अनोखं ज्यूस सेंटर

गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये ग्रीनोबार नावाचं ज्यूस विक्री करणारं दुकान सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनलं आहे. या दुकानात ज्यूसची ऑर्डर दिल्यावर लगेच ज्यूस मिळत नाही. तर प्रत्येकाला आपल्याला हवं असलेलं ज्यूस स्वतः तयार करण्याची संधी मिळते. ग्राहकांना स्वतः फळं घेऊन त्याचं ज्यूस काढण्याची संधी मिळत असल्याामुळे ज्यूसची विश्वासार्हताही वाढते आणि नागरिकांना हा अनोखा प्रयोग आकर्षित करतो. 

View this post on Instagram

A post shared by Greenobar (@thegreenobar)

स्वतःच काढा ज्यूस

व्हायरल झालेल्या व्हिडिओत मोहित केसवानी नावाचा तरुण सायकलवर बसून स्वतःच कलिंगडाचं ज्यूस काढत असल्याचं दिसतं. झिरो वेस्टेज संकल्पनेवर हे ज्यूस सेंटर उभारण्यात आलं असून त्याला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. 

हे वाचा -

ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद

या ज्यूस सेंटरला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. आपल्यालाही अशाच प्रकारे ज्यूस सेंटरवर येऊन आपल्या आपण ज्यूस काढून पिण्याची इच्छा असल्याचं एका युजरनं म्हटलं आहे, तर अशा प्रकारच्या सायकल जिममध्ये बसवायला हरकत नाही, असा सल्ला दुसऱ्यााने दिला आहे. अहमदाबादमधील या ज्यूस सेंटरला भेट देणाऱ्या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्याचा व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे.

First published:
top videos

    Tags: Business, Gujrat, Viral video.