मुंबई, 10 जून : एक गोंडस बालक माळरानावर दुडूदुडू बागडतोय असा VIDEO तुम्हाला एखाद्या ग्रूपवर एव्हाना नक्कीच पाहायला मिळाला असेल. आपलं बाळ कसं एकटं बागडतंय, हे दाखवायला सुरुवातीला हौशी पालकांनी कौतुकाने काढलेला हा VIDEO वाटतो. पण एका क्षणी मात्र काळजाचा ठोका चुकतो. गंमत म्हणून जमिनीवरच्या वेटोळ्याला हात लावताक्षणी तो नाग फसकन फणा काढतो. या छोट्या मुलाला मात्र त्याचं गांभीर्य वाटत नाही, पण VIDEO काढणाऱ्याचा हात मात्र थरथकतो. पुढे काय होतं, ते या व्हीडिओ क्लिपमध्येच पाहा.
हा VIDEO विविध सोशल मीडिया ग्रूपवरून प्रचंड व्हायरल होत आहे. हा नेमका कुठला, कुणी केला याविषयी माहिती मिळालेली नाही. पण काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO प्रचंड फॉरवर्ड होत आहे. #viralvideopic.twitter.com/pPht7vrUdC
हा VIDEO दिवसभरातला सर्वात जास्त फॉरवर्ड झालेला VIDEO ठरत आहे. अनेकांच्या Whatsapp ग्रूपवर आणि सोशल मीडिया ग्रूपवर हा व्हिडीओ पाहिला जात आहे आणि शेअर होत आहे. हा व्हिडीओ नेमका कुणी शूट केला, कुणी शेअर केला हे सांगणं कठीण आहे. हा व्हिडीओ कुठला हेदेखील अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण मराठीतच बोलणं ऐकू येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलाच व्हीडिओ असेल असं वाटतं.
बेजबाबदार पालक असं या व्हिडीओ शेअर करणारे लिहित असले, तरी साप किंवा नाग असेल याची पालकांनाही कल्पना असेल असं वाटत नाही. एका क्षणात, अगदी अनपेक्षितपणे तिथला नाग फणा काढतो. त्यामुळे पालकांनाही सरसकट दोष देणं माहिती घेतल्याशिवाय योग्य ठरणार नाही. सोशल मीडियात एखादा VIDEO कसा आणि किती पटकन व्हायरल होईल सांगता येत नाही. त्याचंच हे उदाहरण.