क्या बात! लॉकडाऊनच्या काळात 83 टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर खूश

क्या बात! लॉकडाऊनच्या काळात 83 टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर खूश

लॉकडाऊन काळात पुणे पोलिसांची प्रतिमा उंचावल्याचं एका ऑनलाईन सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

  • Share this:

पुणे, 10 जून: लॉकडाऊन काळात पुणे पोलिसांची प्रतिमा उंचावल्याचं एका ऑनलाईन सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 83 टक्के पुणेकर पोलिसांच्या कामावर खूश आहेत. पुणे पोलिसांनी लॉकडाऊन 4.0 दरम्यान 'पब्लिक पल्स सर्वे' या नावाने एक ऑनलाईन सर्व्हे घेतला होता. त्यात तब्बल 23 हजार पुणेकरांनी सक्रीय सहभाग नोंदवला. त्यापैकी तब्बल 83 टक्के पुणेकरांनी पुणे पोलिसांचं काम अतिशय उत्तम असल्याचं मत नोंदवलं आहे, अशी माहिती डीसीपी संभाजी कदम यांनी 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना दिली. तसेच पुणेकरांनी या माध्यमातून पोलिसांच्या कामाची पावती दिल्यानं पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी समाधान व्यक्त केल्याचं संभाजी कदम यांनी सांगितलं.

हेही वाचा... पुण्यात मोठी कारवाई! साडे सात कोटींच्या बनावट नोटा जप्त, लष्करी अधिकाऱ्यासह 6 जण अटकेत

कोरोना संसर्गाच्या काळातही पुणे पोलिसांनी पुणेकरांसाठी ऑनलाईन ई पास, घरपोच अन्नधान्य वाटप अनेक उपक्रम राबवले होते. त्यामुळे पुणेकरांच्या मनात पोलिसांची प्रतिमा उंचावण्यात मोठी मदत झाल्याचं निरिक्षण या सर्वेत नोंदवलं गेलंय. या सर्वेदरम्यान पुणे पोलिसांनी पुणेकरांच्या समोरची नेमकी आव्हान काय आहेत, याचाही कानोसा घेतला असता तब्बल 27 टक्के पुणेकरांनी आर्थिक अडचणीसोबतच नोकरी गमावण्याची भीती व्यक्त केली आहे. तर 23 टक्के लोकांनी लॉकडाऊन दरम्यान पुरेसा भाजीपाला मिळाला नसल्याची तक्रार नोंदवली आहे. 11 टक्के लोकांनी सोशल डिस्टंसिंगबाबत चिंता व्यक्त केली आहे. याच लॉकडाऊनच्या काळात 11 टक्के पुणेकरांना मानसिक आणि शारीरिक समस्यांचा तणाव जानवल्याचं म्हटल आहे. या सर्वेचं वैशिष्ठ्य म्हणजे तब्बल 74 टक्के लोक हे 20 ते 40 वयोगटातले होते.

पुणे पोलिसांचा 'लॉकडाऊन' सर्व्हेतील ही आहेत महत्त्वाची मुद्दे...

- 83 टक्के पुणेकर पुणे पोलिसांच्या कामावर खुश !

-ई -पास मिळाला नसल्याच्याही 3 टक्के तक्रारीकोरोनाच्या महामारीमुळे 27 टक्के पुणेकरांना आर्थिक चणचण

-लॉकडाऊननंतर 27 टक्के पुणेकरांना नोकरी जाण्याचीही चिंता

-लॉकडाऊन दरम्यान, 23 टक्के लोकांना पुरेसा भाजीपाला मिळण्यात अडचणी

-11 टक्के पुणेकरांकडून लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टंट पाळलं न गेल्याची तक्रार

-11 टक्के पुणेकरांना लॉकडाऊन काळात मानसिक तणावाचा त्रास

-11 टक्के पुणेकरांना लॉकडाऊनदरम्यान, शारिरिक आरोग्याच्या समस्या

-6 टक्के पुणेकरांना डॉक्टरांची सेवा मिळाली नाही6 टक्के पुणेकरांना मोलकरीण सेवा मिळाली नसल्याची खंत

-'पुणे पल्स' सर्वेक्षणात 22791 पुणेकरांचा ऑनलाईन सहभाग

-लॉकडाऊन 4.0 दरम्यान पुणे पोलिसांकडून सर्वेक्षण

- 20 ते 40 वयोगटातील तब्बल 74 टक्के पुणेकरांचा सर्वेक्षणात सहभाग

हेही वाचा...पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार पडली विहिरीत, आईसह दोन चिमुरड्यांचा करुण अंत

First published: June 10, 2020, 7:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading