मुंबई, 10 जून : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणारी अलाना सध्या मात्र एका वेगळ्याच कारणानं सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं शेअर केलेल्या बिकीनी फोटोवरून सध्या सोशल मीडियावर खूप गोंधळ सुरू झाला आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी अश्लील कमेंट केल्या आहेत. ज्याबाबात अलानानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
अलाना पांडेनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी काही बिकिनी फोटो शेअर केले होते. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे, या फोटोवरुन तिला एका महिला युजरनं गँगरेपची धमकी दिली आहे. हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा अलानानं याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. अलानानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, माझ्या पोस्टवर एका महिलेनं कमेंटमध्ये लिहिलं होतं की, माझ्यावर गँगरेप व्हायला हवा. कारण मी बिकीनी फोटो शेअर केला होता. एवढंच नाही तर त्या महिलेनं माझ्या आई-वडीलांनाही टॅग केलं होतं. त्यांनी सुद्धा माझी पोस्ट पाहावी असा तिचा उद्देश होता.
अंकिता लोखंडेनं लॉकडाऊनमध्ये गुपचूप उरकला साखरपुडा? Photos मुळे उठले सवाल
अलानानं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, बरं झालं असतं की, मी त्यावेळी तिच्या कमेंटचा स्क्रीनशॉट घेतला असता. पण मी ती कमेंट बघून खूप घाबरुन गेले होते. मी त्या महिलेला ब्लॉक केलं आणि ती कमेंट सुद्धा डिलिट केली. अलानानं सांगितलं की, मला गँगरेपची धमकी देणारी ही महिला विवाहित होती आणि तिला एक मुलगी सुद्धा आहे. जी माझ्यापेक्षा लहान आहे. मला समजत नाही की, लोक दुसऱ्यांच्या मुलांबद्दल असे विचार कसे करू शकतात.
लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्यांना बिग बींनी दिला मदतीचा हात, विमानानं सोडणार घरी
अनन्या पांडेची चुलत बहीण अलानासोबत घडलेल्या या घटनेला एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. अलानानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, मी खरं तर या आधीच याबद्दल बोलायला हवं होतं. अशा कमेंट माझ्या फोटोंवर रोज येत असतात आणि रोज सकाळी उठल्यावर अशा गोष्टी वाचणं आता आयुष्याचा एक भाग झाला आहे मात्र असं करणारे लोक फक्त 1% आहेत. अलाना ही एक बिकिनी मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
मीकानं बर्थडे पार्टीत राखीला जबरदस्ती केलं KISS, अनेक वर्षांनी दिलं स्पष्टीकरण