मुंबई 31 जानेवारी : चोरीचे अनेक व्हिडीओ तुम्ही इंटरनेटवर पाहिले असणार, चोर कशा पद्धतीने आपलं डोकं लावून चोरी करतात. हे बऱ्याचदा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. या फुटेजवरुन पोलीसांनी देखील चोरांचा मागोवा घेत त्यांना अटक केली आहे. पण सध्या चोरीचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून पोलीस चोराला कसं आणि कुठून शोधून काढतील हाच मोठा प्रश्न पडला आहे.
आता तुम्ही म्हणाल की पोलिसांसाठी काय कठीण आहे. एकदा का पुरावा मिळाली की पोलीस त्याला काढतीलच शोधून, हा तर व्हिडीओ आहे. मग चोराला शोधणं अवघड का?
हे ही पाहा : ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला सोडून आपापसात भांडू लागले डॉक्टर, Live Footage समोर
पण जर तो चोर एखादा माणूस असता तर त्याला शोधता आलं असतं, पण जर तुम्हाला सांगितलं की एका उंदराने चोरी केली आहे, तर तुमचा विश्वास बसेल? हो, उंदराने एका डायमंडच्या नेकलेसची चोरी केली आहे.
उंदराच्या चोरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे की उंदीर कसा दुकानातील डायमंडचा नेकलेस पळवून नेतो.
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली, म्हणून चोर कोण आहे, हे कळू शकलं. नाहीतर हा प्रकार कोणी केला हे कोणालाच कळू शकलं नसतं. पण आता खरी मजा आहे, कार चोर तर मिळाला आहे, पण त्याला कसं आणि कुठे शोधायचं हा मोठा प्रश्न उपस्थीत झाला आहे.
#अब ये चूहा डायमंड का नेकलेस किसके लिए ले गया होगा.... pic.twitter.com/dkqOAG0erB
— Rajesh Hingankar IPS (@RajeshHinganka2) January 28, 2023
रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ केरळमधील कासारगोडचा आहे असं म्हटलं जात आहे. किसना ज्वेलरीचे शोरूम येथे आहे. मालकाने अनेक हार शोपीसमध्ये ठेवले होते. एक दिवस एक हार अचानक गायब झाला, तेव्हा त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यांना हे दृश्य दिसले, जे पाहून ते थक्क झाले.
हा व्हिडीओ Rajesh Hingankar IPS यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला शेअर करत त्यांनी कमेंटमध्ये लिहिलंय, "आता हा उंदीर कोणासाठी नेकलेस घेऊन गेला असावा?" त्यांच्या या प्रश्नाला नेटकऱ्यांनी मजेदार पद्धतीने उत्तर दिलं आहे. अनेकांचं म्हणणं आहे की, ''तो वेलन्टाइनची तयारी करत असावा'' तर काहींनी म्हटलंय की, ''यावर विश्वास ठेवणं देखील कठीण आहे.''
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Social media, Social media trends, Top trending, Videos viral, Viral