मुंबई 30 जानेवारी : जगभरात लोक डॉक्टांरा देव मानतात. कारण एखाद्या माणसाचं जीव वाचवने किंवा त्याला जिवनदान देणं हे डॉक्टरच्या हातात आहे. मात्र बऱ्याचदा डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे काही रुग्णाचे प्राण गेल्याच्या देखील अनेक घटना समोर आल्या आहेत. पण यासंबंधीत एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. हा व्हिडीओ डॉक्टरांचा आहे. ज्यामध्ये डॉक्टर आपल्या रुग्णाला सोडून भांडण करत आहे. हा व्हिडीओ घटनेचा लाईव्ह व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ ऑपरेशन थिएटर किंवा ओटीमधील असल्याचे सांगितले जाते. ज्यामध्ये डॉक्टर आपल्या रुग्णाकडे लक्ष देण्याऐवजी भांडण करत आहेत. हे ही पाहा : Video : हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात; कित्येक मीटर उंच उडाली व्यक्ती आणि… जेव्हा रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनसाठी नेले जाते तेव्हा काहीतरी काळजी करण्याची गोष्ट असते हे नक्की. अशावेळी त्या रुग्णाचे नातेवाईक बाहेर चिंतीत असतात. अशा परिस्थीतीत जर डॉक्टर अशाप्रकारच्या गोष्टी करत असतील, तर हे खरंच लजास्पद कृत्य आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये काय होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण ऐकत आलो आहोत की, डॉक्टरांची टीम रुग्णाची शस्त्रक्रिया करते आणि बाकीचे लोक त्यांच्या मदतीसाठी एकत्र उभे असतात. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. होय, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की काही डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये एकत्र रुग्णावर शस्त्रक्रिया करत आहेत आणि अचानक दोन डॉक्टरांमध्ये काही मुद्द्यावरून भांडण झाले. यानंतर दोघेही एकमेकांशी भांडतात आणि वाद घालू लागतात. त्याचवेळी कोणीतरी आपल्या मोबाईल कॅमेऱ्याने ऑपरेशन थिएटरच्या आतील सर्व गोष्टी रेकॉर्ड केल्या आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, रुग्ण स्ट्रेचरवर पडलेला आहे आणि डॉक्टरांसह संपूर्ण टीम त्याच्याभोवती उभी आहे आणि त्यानंतर एका डॉक्टर असे काही बोलतो की शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर भडकतात आणि त्यांनी आपापसात वाद घालू लागतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहताच लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.
आतून लाइव्ह फुटेज समोर आल्यावर लोकांना धक्काच बसला. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. rajkotmirrornews ने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्याच्या वेगवेगळ्या कमेंट्स आल्या आहेत. लोकांनी या डॉक्टरांना ट्रोल केलं आहे आणि त्यांना निलंबित करण्याची देखील मागणी केली आहे.