मुंबई 24 ऑगस्ट : सापाचं नाव जरी घेतलं तरी अनेकांना घाम फुटू लागतो. मग विचार करा की, जर खरोखरंच साप समोर आला तर काय होईल? तसे पाहिले तर सापाच्या अनेक जाती आहेत. परंतू यांपैकी बहुतांश साप हे विषारी असतात. लहान प्राणी, सरडा, बेडूक उंदीर आणि पक्षी हे सापांचे शिकार आहे. सापाने यांना एक दंश जरी केला की, त्यांचा जीव वाचवण्याची तडफड तेथेच संपते. परंतु सध्या एक असा व्हिडीओ समोर आला आहे. जो खूपच आश्चर्यकारक आहे. कारण या व्हिडीओमध्ये चक्क उंदीर सापाशी भांडताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक उंदीर कोब्राशी लढताना दिसत आहे. तुम्ही जर पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की हा साप साधा नाही तर तो किंग कोब्रा आहे. हा सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. परंतु अशा विषारी सापावर उंदीर हल्ला करत आहे. म्हणजे त्याला एकतर आपल्या जीवाची पर्वा नाही किंवा त्याला हा साप विषारी आणि यामुळे आपले प्राण जाऊ शकते, याची कल्पना नाही. हे वाचा : मौजमस्तीसाठी बैलाच्या शिंगाला आग लावली; पण त्यानंतर जे घडलं, त्याचा विचार करणं अशक्य खरंत उंदीर हे आपल्या पिल्ला वाचवण्यासाठी करत होतं. हे व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता. खरंतर आपल्या किंग कोब्रा गेल्यानंतर उंदीर आपलया पिल्लाकडे गेला आणि त्याला बाजूला केलं.
या उंदराचं नशीब देखील इतकं चांगलं आहे की, किंग कोबरा या उंदरावर हल्ला करण्याच्या मुडमध्ये नव्हता, नाहीतर या उंदराचं काय झालं असतं. हे आपल्याला चांगलंच माहित आहे. हे वाचा : जंगलातील त्या थरारक घटनेचा Video Viral, पाणी पिणाऱ्या बिबट्यासोबत काय घडलं? पाहा दरम्यान, उंदराने किंग कोब्राच्या शेपटीलाही चावा घेतला. यादरम्यान, उंदरापासून आपला जीव वाचवून किंग कोब्राला पळून जावे लागते. तसेच त्याने उंदराच्या पिल्लाला ही सोडलं होतं. हा व्हिडीओ यूट्यूबवर आतापर्यंत ९० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोकांनी या व्हिडीओवर जोरदार कमेंट्स आणि लाईक केलं आहे.