मॅड्रिड 24 ऑगस्ट : माणसाला आपलं मन रमवण्यासाठी काही ना काही मनोरंजन हवं असतं, ज्यासाठी ते व्हिडीओ पाहाणे, चित्रपट पाहाणे, खेळणे यांसारख्या गोष्टी करतात. हे चांगलं देखील आहे कारण या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर पॉझिटिव परिणाम होतो. परंतु जोपर्यंत आपल्या मनोरंजनामुळे कोणालाही त्रास होत नाही, तो पर्यंत ठिक आहे, परंतु जेव्हा आपलं मनोरंजन दुसऱ्याला त्रास देण्यापर्यंत पोहोचतं, तेव्हा मात्र त्याचे परिणाम फार भयंकर होतात. या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, जेव्हा मजा म्हणून एक व्यक्ती प्राण्याला त्रास देते, तेव्हा त्या व्यक्तीला त्याची किती मोठी शिक्षा भोगावी लागते. प्राण्यांना त्रास देणे हे तसंही कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे आपण त्यांना काहीही त्रास दिला तर आपल्याला कायद्याने शिक्षा देण्याची तरतुद आहेच, परंतु या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये या बैलाने स्वत:च आपल्याला त्रास देणाऱ्या माणसाला धडा शिकवला आहे. स्पेनमध्ये सणाच्या नावाखाली या वन्य प्राण्यांचा छळ केला जातो. येथे बैल रस्त्यावर सोडून त्यांना चिथावणी दिली जाते. यानंतर त्यांना लोकांवर हल्ले करण्यास भाग पाडले जाते. स्पॅनिश फेस्टिव्हल पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक तेथे येतात. परंतू हा खेळ खूपच धोकादायक आहे. या धोकादायक खेळाला आणखी रंजक बनवण्यासाठी लोकांनी बैलाच्या शिंगाला आग लावली होती. परंतु यामुळे बैल आणखी जास्त चिढला आणि त्याने रागाच्या भरात एका 24 वर्षीय तरुणावर हल्ला केला, ज्यामध्ये त्या तरुणाचा जीव गेला आहे. एड्रियन मार्टिनेझ फर्नांडिस असे या व्यक्तीचे नाव आहे. बैलाने या तरुणाच्या पोटात अनेक वेळा शिंग मारले, त्याने हे तोपर्यंत केलं, जोपर्यंत या तरुणाने आपले प्राण सोडले नाही. उत्सवाच्या नावाखाली निष्पाप प्राण्यांवर अत्याचार केले जातात. अधिक करमणुकीच्या नावाखाली बैलाच्या शिंगाला आग लावण्याचे हे ताजे प्रकरण रविवारचे आहे. ज्यामध्ये या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.