मुंबई 23 ऑगस्ट : जंगलातील प्राण्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या समोर येत असतात. यांपैकी काही व्हिडीओ हे आपल्याला आश्चर्यचकित करतात. जंगलात कधी कोणती घटना होईल हे आपण सांगु शकत नाही. परंतु आपल्या हे तर माहित आहे की, जंगलातील जीवन साखळी हे एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे आपलं पोट भरण्यासाठी प्राणी एकमेकांची शिकार करत असतात. जंगलात मांसाहारी आणि शाकाहारी अशा दोन्ही प्रकारचे प्राणी असतात. त्यांपैकी वाघ, सिंह, बिबटया हे जंगलातील सगळ्यात धोकादायक शिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या तावडीत कोणी सापडलं की त्यांचा खेळ संपलाच म्हणून समजा. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ काही वेगळंच दृश्य दाखवतोय. आपण शिकारा संबंधीतले देखील अनेक व्हिडीओ पाहिले आहे. हे व्हिडीओ खरोखरंच खूप भयानक असतात. जे पाहून अंगावर काटा उभा राहातो. परंतु सध्या एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये बिबट्या पाणी पिण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर आला आहे. परंतु त्याला जरा ही कल्पना नव्हती की, यावेळी तो दुसऱ्या कोणाचा तरी शिकार आहे. हे वाचा : प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी महिलेचा जीवघेणा प्रयत्न; तिने असं काय केलं? पाहा Video नक्की काय घडलं? बिबट्या पाणी पिताना मगरीने त्याला शिकार बनवण्याचे ठरवलं आणि त्याला पकडण्यासाठी सेकंदात पाण्याबाहेर आपलं तोंड काढलं. परंतु या बिबट्याचं नशीब इतकं चांगलं होतं की, तेवढ्याच सेकंदात त्याने आपलं तोंड मागे घेतलं आणि लांब उडी घेतली. परंतु हा बिबट्या पाण्यात पडला, पण पुढे क्षणाचाही विलंब न करता तो पाण्याबाहेर आला आणि लांब पळून गेला.
No one is supreme in #nature..
— Surender Mehra IFS (@surenmehra) August 23, 2022
It’s more about adaptation and responses in wild for survival..#SurvivalofFittest@susantananda3
pic.twitter.com/yFfDggi3a1
शिकार करणाऱ्या शिकाऱ्यावर स्वत:चा जीव वाचवण्याची वेळ येणं हे कदाचित तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं असेल. हा फारच दुर्मिळ आणि हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ आहे. ज्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे हे वाचा : Viral Video : पोलिसांपासून वाचण्यासाठी व्यक्तीने वापरली अशी ट्रिक, पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य हा व्हिडीओ Surender Mehra IFS यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. ज्याला नेटकऱ्यांकडून मोठ्याप्रमाणावर शेअर आणि लाईक केलं जात आहे.