मुंबई 14 डिसेंबर : सोशल मीडियावर रोज प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात साप, नाग किंवा किंग कोब्राचे व्हिडिओदेखील असतात. बऱ्याचदा अशा व्हिडिओत आपण एखाद्या ठिकाणी विषारी साप, नाग किंवा किंग कोब्रा आढळल्याचं बघतो. काही वेळा साप, नागाच्या विषावर प्रयोग करणाऱ्या निरनिराळ्या प्रयोगशाळांमधले व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर किंग कोब्राशी संबंधित जरा वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आश्चर्यचकित करणारा आहे. किंग कोब्रा अत्यंत विषारी असतो. किंग कोब्राचं विष इतकं जहाल असतं, की त्याने एखाद्याला दंश केला तर ती व्यक्ती किंवा प्राणी अगदी काही मिनिटांत मृत्युमुखी पडतो; मात्र किंग कोब्राचा सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडिओत एक व्यक्ती किंग कोब्राला चक्क थंड पाण्याने आंघोळ घालताना दिसत आहे. हा नेमका काय प्रकार आहे, ते जाणून घेऊ या. हे ही पाहा : रेल्वे क्रॉसिंगवर थांबलेल्या कारला ट्रक न दिली धडक, तेवढ्यात ट्रेन आली आणि.. पाहा Video साप किंवा नाग उन्हाळ्याच्या दिवसांत थंड ठिकाणी तर थंडीच्या दिवसात उबदार ठिकाणी दडून बसतो. तो अशा जागी बसतो की सहजासहजी कोणाला दिसणार नाही. किंग कोब्रा हा सर्वांत विषारी सर्प मानला जातो. किंग कोब्रा लढतानाचे किंवा एखाद्या कोपऱ्यात दडलेला असल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील; पण सध्या किंग कोब्राचा एक हटके व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती चक्क किंग कोब्राला थंड पाण्याने आंघोळ घालताना दिसत आहे. विशेष म्हणजे आंघोळ घालणाऱ्या व्यक्तीवर तो एकदाही हल्ला करताना दिसत नाही.
किंग कोब्राचा हा व्हिडिओ @Gulzar_sahab नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘एवढ्या थंडीत बिचाऱ्या सापाला थंड पाण्याने आंघोळ घालतोय,’ असं लिहिलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 26 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. बाथरूममध्ये असलेल्या एका व्यक्तीने हे आश्चर्यकारक दृश्य कॅमेरात टिपलं आहे. एक व्यक्ती न घाबरता बाथरूममध्ये किंग कोब्राला आंघोळ घालत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओत, एका बाथरूममध्ये एक महाकाय किंग कोब्रा असून, त्याच्यासोबत एक व्यक्ती आहे. ही व्यक्ती हातात मग घेऊन थंड पाण्याने किंग कोब्राला आंघोळ घालत आहे. ज्याप्रमाणे आई-वडील आपल्या लहान मुलांना आंघोळ घालतात, अगदी त्याचप्रमाणे ही व्यक्ती किंग कोब्राला आंघोळ घालत आहे. विशेष म्हणजे आंघोळ सुरू असताना किंग कोब्रा त्या व्यक्तीवर हल्ला करत नाही. एकदा कोब्रा आपला फणा त्या व्यक्तीच्या हातातला मगकडे नेतो; पण ती व्यक्ती मगच्या सहाय्याने कोब्राला बाजूला करते आणि हाताने त्याला पुन्हा आंघोळ घालण्यास सुरुवात करते, असं दृश्य दिसतं. हे दृश्य पाहताना प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. तसंच हे दृश्य पाहिल्यावर आश्चर्यदेखील वाटतं. या दृश्यावर सुरुवातीला कोणाचा विश्वासदेखील बसत नाही; मात्र हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरला आहे.