जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मॅचदरम्यान नवऱ्यानं बायकोसाठी केली अशी गोष्ट; पाहून तुम्ही म्हणाल, हा तर Husband of the year

मॅचदरम्यान नवऱ्यानं बायकोसाठी केली अशी गोष्ट; पाहून तुम्ही म्हणाल, हा तर Husband of the year

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मॅच पाहताना चाहत्यांचे अनेक फोटो व्हिडिओ व्हायरल होतात, त्यांपैकीच हा एक आगळावेगळा व्हिडीओ आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 19 डिसेंबर : नवरा बायकोच्या नात्यात रुसवा-फुगवा हे सगळं असतं. बायकोच्या मेकअप करण्यावरून नवऱ्याच्या तोंडी टाकलेले अनेक विनोद तुम्ही आजपर्यंत ऐकले असतील. बऱ्याच पुरुषांना बायकोने मेकअप केलेला आवडत नाही, पण सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात पती स्वतःच पत्नीला मेकअप करण्यासाठी मदत करतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या पतीचं खूप कौतुक होतंय. सध्या इंटरनेटमुळे जग खूप जवळ आलंय. त्यामुळे सोशल मीडियावरील एखादी माहिती इतरांपर्यंत खूप वेगाने पोहोचते. आता बहुतेक सर्वजण इंटरनेट वापरतात, त्यामुळे एखाद्याने शेअर केलेला व्हिडिओ किंवा फोटो अवघ्या काही क्षणात असंख्य लोकांपर्यंत पोहोचतो. सध्या अशाच एका जोडप्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हे ही पाहा : आई ही आई असते, ती वेळ प्रसंगी आपल्या बाळासाठी प्राण देखील देऊ शकते, एकदा हा Video पाहा मॅच पाहताना चाहत्यांचे अनेक फोटो व्हिडिओ व्हायरल होतात, बऱ्याचदा प्रेमी आपल्या प्रेमिकेला प्रपोज करताना दिसतात किंवा काही चाहते त्यांच्या आवडत्या प्लेयरसाठी मेसेज घेऊन येतात आणि ते व्हायरल होतात. अशाच काही व्हायरल व्हिडिओंपैकी हा एक आहे. पण हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. त्याचं कारण म्हणजे त्याने व्हिडिओमध्ये केलेली कृती होय. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक पती त्याच्या शेजारी बसलेल्या पत्नीला मेकअप करताना मदत करताना दिसतोय. त्याने फोन पत्नीसमोर आरशासारखा पकडला आहे आणि त्याची पत्नी त्यात स्वतःला बघून मेकअप करत आहे. पत्नीला नीट मेकअप करता यावा, यासाठी पती किती प्रेमाने फोन घेऊन बसला आहे. आज पाहिलेला हा इंटरनेटवरचा सर्वात प्रेमळ व्हिडिओ आहे. आजकाल पत्नीने मेकअप करावा, यासाठी कोणताही पती एवढी मदत करत नाही, अशा विविधांगी प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत. तर, काही जणांनी पतीला सहनशील म्हटलंय. एकाने तर ‘बिचारा पती, शांत बसून सामनाही बघू शकत नाही,’ अशी कमेंट केली आहे.

जाहिरात

दरम्यान, ही 10 सेकंदाची क्लिप ‘गुलजार साहब’ नावाच्या ट्विटर युजरने 16 डिसेंबर 2022 रोजी शेअर केली होती. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘हजबंड ऑफ द इयर’ असं लिहिलं होतं.

News18लोकमत
News18लोकमत

आतापर्यंत या व्हिडिओला २7 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. मोठ्या प्रमाणात युजर्स यावर कमेंट्स करत आहेत, अनेकांनी हा व्हिडिओ रिशेअरही केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात