मुंबई 15 डिसेंबर : प्रत्येक आई आपल्या मुलांना जिवापाड जपते. प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून ती मुलांचा जीव वाचवते. मग ही आई मनुष्य रूपातली असो किंवा प्राणी. मानवाप्रमाणे प्राणीसुद्धा आपल्या पिल्लांची फार काळजी घेतात. ही गोष्ट अधोरेखित करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माकडीण काही श्वानांच्या हल्ल्यापासून आपल्या पिल्लाला वाचवताना दिसत आहे. आपल्या पिल्ला श्वानांच्या हल्ल्यापासून वाचवणाऱ्या माकडिणीचा व्हिडिओ इंटरनेट युझर्सची मनं जिंकत आहे. 13 डिसेंबरला ऍड. नाजनीन अख्तर या ट्विटर अकाउंटवरून ही क्लिप शेअर करण्यात आली आहे. काही वेळातच ती व्हायरल झाली आहे. “#आई तर आई असते आणि तिने या श्वानांपासून आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केलं,” अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी ट्विटरवर जाऊन या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. सोबतच त्यांनी या माकडिणीला मदत करण्याऐवजी व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीलाही फटकारलं आहे. एका युझरने कमेंट केली, की “हा व्हिडिओ बनवणारा माणूस माझ्या दृष्टीने सर्वांत वाईट व्यक्ती आहे.” आणखी एका युझरने कमेंट केली आहे, की “तुम्ही व्हिडिओ बनवणार्याला जागृत केलं, तर माणूस म्हणून तुमचं कर्तव्य पार पडेल.” एका युझरने अशी कमेंट केली, की “माकडिणीने आई होण्याचं कर्तव्य पार पाडलं; पण हा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीने माणूस म्हणून कर्तव्य पार पाडलं नाही.”
#मां तो मां होती है ना इन कु*त्तों से अपने बच्चों को बचाने की हर मुमकिन कोशिश करती है,,,,😥https://t.co/N84FUYIaWz pic.twitter.com/rzy51UsF5s
— Adv.Nazneen Akhtar (@NazneenAkhtar10) December 13, 2022
आईचं प्रेम किती नि:स्वार्थ असतं हे या व्हिडिओने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. एक माकडीण स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न कसा करते, हे या क्लिपमध्ये दिसत आहे. व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये माकडीण आपल्या पिल्लासोबत नदीतल्या रिकाम्या होडीवर बसलेली दिसत आहे. तिथे दोन श्वान येतात आणि त्यांच्यावर हल्ला करायला लागतात. श्वान पिल्लाचा चावा घेण्याचा प्रयत्न करत असताना माकडीण आपल्या बाळाला कसं झाकून ठेवतं हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आपल्या बाळाला काहीही होऊ नये म्हणून ती कुत्र्यांच्या तीक्ष्ण दातांच्या दिशेला आपली पाठ करते. एक आई आपल्या मुलांसाठी ढाल बनते. कोणत्याही संकटापासून त्यांचं रक्षण करते. मग तिला त्याचे काहीही परिणाम भोगावे लागले तरी चालतात, याचा हा व्हिडिओ पुरावा आहे. या धक्कादायक, पण हृदयस्पर्शी क्लिपने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.