मुंबई 17 जानेवारी : सगळ्या सापांमध्ये किंग कोब्रा हा सर्वात धोकादायक साप आहे. त्याने एकदा हा व्यक्तीला दंश केला की, तो संपलाच म्हणून समजा. कारण त्याचं विष इतकं विषारी असतं की, बऱ्याचदा माणसाला रुग्णालयात जाण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. पण असं असलं तरी देखील काही लोक असे आहेत, ज्यांना आपल्या मृत्यूशी खेळणं आवडतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो सापाशी संबंधीत आहे. या व्हिडीओमधील तरुण भल्यामोठ्या किंग क्रोब्यासोबत खेळत आहे. लग्नानंतर मुलींच्या शरीरात होतात ‘हे’ बदल, जाणून विश्वास बसणार नाही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तरुणाने आपल्या एका हाताने किंग कोब्राला पकडलं आहे. तेव्हा हा साप त्या तरुणावर हल्ला करण्यासाठी मागे वळतो. पण या तरुणाचं नशीब चांगलं असतं की त्याला पुढे साप काहीही करत नाही. हा साप या तरुणावर असा काही हल्ला करतो की पाहाताना वाटतं की आता याचा खेळ संपलाच, पण नशीबाने साप त्याला काहीही करत नाही. पण पुढे तुम्ही पाहू शकता की साप वारंवार या तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण असं असलं तरी देखील हा तरुण किंग कोब्राला सोडत नाही. या तरुणाचा हा सगळा प्रयत्न फक्त व्हिडीओ बनवण्यासाठी सुरु असतो. विचार करा की जर या सापाने दंश केला असता, तर या तरुणाचं काय झालं असतं.
तुम्ही व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हा माणूस किंग कोब्राला त्याच्या शेपटीने ओढत आहे आणि त्रास देत आहे. त्याचवेळी समोरचा एक व्यक्ती हा व्हिडीओ बनवताना दिसत आहे.
सुमारे एक मिनिटाच्या या व्हायरल व्हिडीओने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तरुणाने किंग कोब्राची शेपटी एकदा नव्हे तर अनेक वेळा पकडली आणि त्याच्याशी खेळू लागला. किंग कोब्रानेही तरुणावर हल्ला केला, पण योग्य अंतर ठेवल्यामुळे तो तरुण पुन्हा पुन्हा वाचला.