मुंबई 15 जानेवारी : लग्न करणं हे प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे. यानंतर त्यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होणार असते. नवीन लोक, नवीन गोष्टी, नवीन घर आणि नवीन परंपरा या सगळ्याच गोष्टी मुलीसाठी चॅलेंजींग असतात. या सगळ्यात मुलीची एकच इच्छा असते की तिच्यावर प्रेम करणारा किंवा तिची काळजी घेणारा नवरा तिळा मिळावा. ज्यामुळे पुढील आयुष्य आनंद जाईल. पण तुम्हाला माहितीय लग्नानंतर मुलींमध्ये अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होतात. तज्ज्ञांच्या मते, मुलींचे शरीर पुनरुत्पादनासाठी बनवले जाते. यौवनानंतर (विशिष्ट वेळेनंतर) त्यांच्या शरीरात अंडी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. ज्यामुळे त्यांना मासिकपाळी येते आणि यानंतर त्या गर्भधारणेसाठी तयार असतात. स्त्रियांचे प्रजनन अवयव देखील लग्नानंतर पूर्वीपेक्षा जास्त परिपक्व होतात. पण अशा अनेक महिला आहेत, ज्यांची कमी वयात लग्न झाल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे गोंधळतात. त्यामुळे प्रत्येक महिलेसाठी ही माहित शैक्षणीक दृष्ट्या महत्वाची आहे. चला या बद्दल सविस्तर जाणून घेऊ. लग्नानंतर मुलींच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. त्यामुळे शरीरात चरबी वाढते, भूक वाढते आणि वजन वाढते. लग्नानंतर मुलींमध्ये इस्ट्रोजेन नावाच्या हार्मोनची पातळी वाढते. त्यामुळे केस दाट आणि काळे होतात. मुलींच्या शरीरातूनही असे अनेक हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचा मुलायम, चमकदार आणि निरोगी बनते. यामुळेच अनेक महिला या लग्नानंतर आणखी सुंदर दिसतात. अनेकदा लग्नानंतर मुलींच्या शरीरातील चरबी वाढते. ही चरबी छाती, नितंब, मांड्या आणि पोटावर जमा होते. शरीरात इस्ट्रोजेन नावाच्या संप्रेरकाची पातळी वाढते, तेव्हा ते हृदयविकारांना आवर घालते. पण असं असलं तरी देखील यामुळे शरीराचा दुर्गंध ही वाढतो. हार्मोन्सच्या बदलामुळे महिलांमध्ये पिंपल्सची समस्या उद्भवते. महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्या तरी त्यांना मुरुमांची समस्या उद्भवतो.
हार्मोन्सच्या सक्रियतेमुळे मेंदू पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय आणि निरोगी होतो. यामुळेच काही महिला लग्नानंतर जास्त समजूतदार होतात. महिलांच्या मासिक पाळीत कोणताही बदल होत नसला तरी. तथापि, संप्रेरकांच्या सक्रियतेमुळे, ती येण्यासाठी विलंब होऊ शकतो किंवा लवकर येऊ शकते.