Home /News /viral /

अनर्थ टळला! प्रशिक्षकाच्या प्रसंगावधानामुळे वाचली जिमनॅस्टिक करणारी मुलगी, हृदयाचे ठोके वाढवणारा व्हिडीओ VIRAL

अनर्थ टळला! प्रशिक्षकाच्या प्रसंगावधानामुळे वाचली जिमनॅस्टिक करणारी मुलगी, हृदयाचे ठोके वाढवणारा व्हिडीओ VIRAL

प्रशिक्षकाशिवाय एखादा खेळ शिकणं अशक्य आहे. खेळामध्ये कोणती पावलं उचलायची ते या खेळामध्ये उंची कशी गाठायची याबाबत प्रशिक्षकांकडूनच वेळोवेळी टीप्स मिळत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रशिक्षकाच्या प्रसंगावधानामुळे एक मुलगी वाचली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 1 मार्च : प्रशिक्षकाशिवाय एखादा खेळ शिकणं अशक्य आहे. खेळामध्ये कोणती पावलं उचलायची ते खेळामध्ये उंची कशी गाठायची याबाबत प्रशिक्षकांकडूनच वेळोवेळी टीप्स मिळत असतात. मात्र सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी तिच्या प्रशिक्षकामुळे वाचली आहे. जिम्नॅस्टिक तसा अतिशय कठीण खेळ आहे आणि या खेळासाठी कामगिरी करण्यासाठी संतुलन, वेग आणि हिम्मत लागते. आपली नजर आणि हातांच्या हालचाली यावरही लक्ष ठेवावं लागतं. बर्‍याच वेळा सर्वोत्कृष्ट खेळाडूंकडून प्रशिक्षणादरम्यान अनेक चुकीच्या गोष्टी होतात.  जिम्नॅस्टिकमध्ये अनेकदा त्यांचं संतूलन बिघडतं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी जिम्नॅस्टिकचा सराव करत होती. पण त्यादरम्यान तिचा तोल बिघडला. ती आता खाली पडणार हे पाहून प्रशिक्षकाने तातडीने त्या मुलीला पकडतो आणि तिला पडण्यापासून आणि दुखापतीतून वाचवतो. ही घटना अमेरिकेतील Nashville मधील आहे. हा व्हिडिओ मुलीच्या पालकांनी बनवला असून त्यांनी सोशल मीडियावर शेअर करताना असं लिहिलं आहे की, 'माझी मुलगी पहिल्यांदाच व्हॉल्टवर उडी मारत होती. तिचा तोल ढासळला आणि जेव्हा तिच्या कोचने ते पाहिलं तेव्हा ती खाली पडताना त्यांनी तिला झेललं. यामुळे माझी मुलगी गंभीर जखमी होण्यापासून वाचली आहे.' सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खूप पसंतीस पडला आहे आणि कोचचे देखील खूप कौतुक केलं जात आहे. एका वृत्तसंस्थेने देखील हा व्हिडीओ शेअर करत प्रशिक्षकाला 'Lifesaver' ची उपाधी दिली आहे. अन्य बातम्या मुलीला पटवण्यासाठी अनोखी शक्कल, दोघींना डेट केल्याच्या रेफरन्ससह पाठवला RESUME सोनूचे स्टार चमकले, एका स्माईलने लेझच्या पाकिटावरही झळकला
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Girl viral video, Goes viral

    पुढील बातम्या