नवी दिल्ली, 01 मार्च : सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेकांची ओळख, प्रेम या सोशल मीडियावर होतं. काही डेटिंग अॅप्ससुद्धा उपलब्ध आहेत. दरम्यान एका मुलाचा Resume सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणत्या कंपनीच्या नोकरीसाठी दिलेला Resume नाही तर डेटसाठी मुलीला दिलेला Resume आहे. कॅलिफोर्नियात सॅन दिएगो विद्यापीठात शिकत असलेल्या जेम्सचा हा Resume जगभर चर्चेत आला आहे. गेल्या चार वर्षांपासून ज्या मुलीवर क्रश होतं त्या मुलीला डेटवर घेऊन जाण्याची जेम्सची इच्छा होती. त्यानं शेवटच्या सेमिस्टरमध्ये मुलीला डेटवर घेऊन जायचं यासाठी असा अनोख्या मार्गाचा वापर केला. त्यानं चक्क Resume पाठवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाने रिज्युममध्ये स्वत:बद्दलची माहिती दिली आहे. यात आपण खुपच Funny असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण आईचा लाडका असून स्टाइल चांगली आहे असंही सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्यानं याआधी डेट केलेल्या दोन मुलींचा रेफरन्स दिला आहे.
told a guy if he rly wanted to take me out on a date then he should send me a cover letter (jokingly ofc) but he actually sent me a resume??? pic.twitter.com/qjNnVImiyx
— kristi (@kristiitat) February 25, 2020
जेम्सने ख्रिस्टी नावाच्या मुलीला हा रिज्युम पाठवला आहे. त्यानंतर ख्रिस्टीने हा रिझ्युम तिच्या ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यात ख्रिस्टीने म्हटलं की,‘मी एका मुलाला मजेत म्हटलं की जर मला डेटला घेऊन जायचं असेल तर मला एक कव्हर लेटर पाठव आणि त्यानं खरंच रिझ्युम पाठवला आहे.’ पाहा VIDEO : लय भारी! या तरुणाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तुम्हीही व्हाल थक्क सोशल मीडियावर या रिझ्युमवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मुलाच्या या क्रिएटिव्ह रिझ्युमचं कौतुक केलं आहे तर काहींनी त्याला कव्हर लेटर आणि रिझ्युम यातला फरक माहिती नसल्याचं म्हटलं. हे वाचा : Zomato च्या डिलिव्हरी बॉयने जिंकलं सगळ्यांचं मन, VIDEO तुफान VIRAL