मुंबई, 01 मार्च : आपल्या स्माईलमुळे सोशल मीडियावरच नाही तर जगभरात सर्वांच्या चर्चाचा विषय ठरलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉय सोनूचा आता आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. या सोनूची स्माईलचा वापर आता लेझ कंपनीने आपल्या लेझच्या पाकिटावर केला आहे. लेझ कंपनीच्या चिप्स पाकिटांवर आता झोमॅटो डिलिव्हरी बॉय सोनूची स्माईल झळकणार आहे. लेझने या संदर्भातील फोटो आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. एक स्माईल कोट्यवधी लोकांची मन जिंकते अशा कॅप्शननं या सोनूचा फोटो लेझनं शेअर केला आहे.
याआधी सोनू नावाच्या या झोमॅटोची फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर झोमॅटोने आपल्या ट्वीटरच्या प्रोफाईलवर याचा फोटो अपलोड केला. याशिवाय पुणे आणि महराष्ट्र पोलिसांनी हेल्मेट न विसरल्य़ाचा आनंद म्हणजे ही स्माईल अशा पद्धतीनं सोनूचा हा व्हिडिओ शेअर केला होता.
टीक टॉकवर दानिश नावाच्या एका युझरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोनू नावाच्या या झोमॅटोची फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर झोमॅटोने आपल्या ट्वीटरच्या प्रोफाईलवर याचा फोटो अपलोड केला आहे. आता हे आकऊंट happy rider साठी फॅन अकाऊंटसारखं काम करेल असं कॅप्शन कंपनीने दिलं आहे. या व्हिडिओमध्ये सोनूच्या कमाईबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने हसत हसत त्याची उत्तर दिली. त्याच्या स्माईलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. डिलिव्हरी बॉय आणि त्याच्या स्मितबद्दलच्या सकारात्मकतेनं सर्वांच्या मनाववर भुरळ घातली आहे.
जेव्हा दानिश सोनूला त्याच्या कमाईबद्दल विचारतो तेव्हा तो सांगतो की तो 12 तास काम करतो. आणि त्यासाठी त्याला Rs 350. रुपये मिळतात. त्यानंतर, जेवणाबद्दल विचारले असता सोनू म्हणतो की हो, रद्द केलेला ऑर्डर त्यांना मिळतात. या प्रश्नाचे उत्तर देताना सोनू म्हणतो की कंपनीत कोणतीही अडचण नाही. कंपनी वेळेवर पैसे आणि जेवण देते.