जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'मौत सें आंख मिलाने की जरूरत क्या है?' हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही घराबाहेर पाऊलही नाही टाकणार

'मौत सें आंख मिलाने की जरूरत क्या है?' हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही घराबाहेर पाऊलही नाही टाकणार

'मौत सें आंख मिलाने की जरूरत क्या है?' हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही घराबाहेर पाऊलही नाही टाकणार

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर घरातून बाहेर पडण्याआधी तुम्ही शंभरदा विचार कराल. त्यामुळं गरज नसताना बाहेर पडलात तर…

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 एप्रिल : कोरोनामुळे भारतात लॉकडाऊन जाहीर केला आहे खरा, मात्र लोकं याकडे गांभीर्याने पाहत नाही आहेत. कारण नसताना घराबाहेर पडून स्वत:सह इतरांचा जीवही धोक्यात घालत आहेत. यासाठी पोलीस बांधव असले तरी, त्यांच्या हातावर तुरी देत लोकं सर्रास रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी सेलिब्रिटींपासून अनेकांनी सोशल मीडियावक व्हिडीओ शेअर केले. मात्र एका असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्ही घराबाहेर पडण्याची हिम्मत करणार नाही. बेवजह घर से निकलने की जरूरत क्या है, मौत से आंख मिलाने की जरूरत क्या है. असं आपल्या गाण्यातून सांगत लोकांना सावध करत आहे. वाचा- VIDEO : सावधान! ग्लोव्ह्जमुळेही पसरू शकतो कोरोना, नर्सनं सांगितलं कारण कोरोनाव्हायरस हा भयंकर विषाणू एकमेकांच्या संपर्कात आल्याने जास्त पसरतो. त्यामुळे घरातच तुम्ही सुरक्षित आहात, असा संदेश ही मुलगी या व्हिडीओमधून देत आहे. गुंजन ठाकूर असे व्हिडीओमध्ये असलेल्या मुलीचे नाव असून आपल्या सुरेल आवाजात ही मुलगी लोकांना समज देत आहे. वाचा- ‘मी कोरोना पॉझिटिव्ह, आता बघा कसा पसरवते’, तरुणीने VIDEOद्वारे दिली धमकी

जाहिरात

वाचा- FACT CHECK : तबलिगीवरून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी थेट अमित शहांना प्रश्न? लॉकडाऊनमध्ये नियम कठोर असतानाही लोक मात्र मनमानी करताना दिसत आहेत. त्यामुळं कलम 144च्या उल्लंघन करणाऱ्यांवर सध्या कारवाई केली जात आहे. दरम्यान 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अद्याप याबबात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात