पुणे 24 ऑक्टोबर चंद्रकांत फुंदे : दिवाळीचा सण म्हटला की मिठाई, कपडे, फटाके यासगळ्या गोष्टी आपोआपच सुचतात. तसेच यासाठी घाई लागते ती फराळ, कंदील, रांगोळी आणि दिवे बनवण्याची. तसेच या काळात लोक सोनं देखील आपल्या घरी घेऊन येतात. पण यावेळी पुण्यातील लोक घरी घेऊन येतायत ती सोन्याची काजू कतली. हो हे खरं आहे. पुण्यातील असं एक दुकान आहे, जे चक्कं सोन्याची काजू कतली विकत आहे. ज्यामुळे येथे चर्चा फक्त या सोन्याच्या काजू कतलीचीच रंगलीय. सोशल मीडिया वर देखील यासंबंधीत फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये तिला पाहण्याची आणि तिच्यासंबंधीत जाणून घेण्याची उत्सुक्ता वाढलीय. सोन्याच्या मिठाईचा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील सुप्रसिद्ध काका हलवाई यांच्या मार्फत दरवर्षी सोन्याची मिठाई बनविण्यात येते. यंदा २४ कॅरेट सोन्याचा वरख लावलेली काजू कतली ही मिठाई बाजारात आणली आहे. हे ही वाचा : आधी एक लाख फटाके आणि मग पेटवून दिली गाडी… प्रसिद्धीसाठी तरुणांचा वेडेपण, Video Viral एका ग्राहकाच्या ऑडरनुसार 4 किलो सोन्याची काजू कतली बनविण्यात आली असून याची किंमत ही 40 हजार आहे. तसेच ही मिठाई विशिष्ठ अश्या डब्यात पॅक करून देण्यात येणार आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये सोन्याची ही काजू कतली कशी दिसते हे पाहू शकता. लोकाना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे आणि लोक ही मिठाई खाण्याची इच्छा देखील व्यक्त करत आहेत. शक्यतो लोक सोन्याचा दागिना विकत घेतात. परंतू इथे तर लोक खाण्यासाठी सोन विकत घेत आहेत.
गेली दोन वर्ष कोरोनाने सर्वांनाच मोठा फटका बसला आहे. पण यंदा निर्बंध मुक्त सण उत्सव साजरा होत असल्याने नागरिकांचा कल मनसोक्त सणाचा आनंद लूटण्याकडे आहे. दुकानदाराच्या म्हणण्यानुसार महागडे फटाके वाजवून पैसे वाया घालावीण्यापेक्षा महागडी मिठाई खाऊन आपला दिवाळी सण गोड करण्याकडे नागरिकांचा कल सध्या दिसत आहे.