जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हा चमत्कार की आणखी काही? अपघातात कारचा चुरा, तरी तरुणाला काहीच झालं नाही, पाहा Video

हा चमत्कार की आणखी काही? अपघातात कारचा चुरा, तरी तरुणाला काहीच झालं नाही, पाहा Video

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

या अपघातात कारची अशी अवस्था झाली आहे की त्यामधील एकही व्यक्ती वाचणे ही शक्य नाही असं तुम्ही म्हणाल. पण या व्हिडीओत काही वेगळंच पाहायला मिळालं, ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 मे : रस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. हे व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. या अपघातात गाड्यांचं नुकसान तर होतंच शिवाय लोक देखील गंभीर जखमी होतात. अनेकांनी तर अशा अपघातात आपले प्राण देखील गमावले आहेत. असाच एक एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये वाहनाची अवस्थापाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. या अपघातात कारची अशी अवस्था झाली आहे की त्यामधील एकही व्यक्ती वाचणे ही शक्य नाही असं तुम्ही म्हणाल. पण या व्हिडीओत काही वेगळंच पाहायला मिळालं, ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. भूतामुळे रस्त्यावर गाडीला अपघात? व्हिडीओचं रहस्य अखेर समोर खरंतर एवढा मोठा अपघात झालेला असून देखील त्यामध्ये बसलेल्या व्यक्ती साधा ओरखडा देखील आला नाही. जे पाहून लोक थक्कच झाले. कारच्या सुरक्षा उपकरणांच्या एअरबॅग्ज आणि सीट बेल्टमुळेच हे शक्य झाल्याचा दावा लोक करत आहेत. अशा परिस्थितीत हा व्हिडीओ शेअर करताना अनेक लोक ड्रायव्हर्सना सीट बेल्ट घालण्याबाबत आणि एअरबॅगसह कार वापरण्याबाबत जागरूक करत आहेत. डॉक्टरांची एक चुक आणि वडिलांनी डोळ्यासमोर पाहिला आपल्या नवजात बाळाचा मृत्यू हा व्हिडिओ IPS अधिकारी स्वाती (@SwatiLakra_IPS) यांनी ट्विटरवर पोस्ट केला आणि लिहिले – सीट बेल्ट आणि एअरबॅगचे महत्त्व. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एका ट्रकखाली कार घुसली आहे. ज्यामुळे कारचा चुरा झाला आहे. अशावेळी काही लोकांना मोठ्या कष्टाने गाडीचा दरवाजा उघडला, त्यानंतर गाडीतून एक वयक्ती बाहेर आली. ही व्यक्ती आपल्या पायावर नीट उभी होती. या व्यक्तीची अवस्था पाहून तुम्ही पाहूच शकता की ज्यापद्धतीने त्याचा अपघात झाला, त्या तुलनेत त्याला काहीच झालेलं नाही. तो आपल्या पायांवर बाहेर येतो आणि चालू लागतो.

जाहिरात

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आहेत. लोकांनी या व्यक्तीचं नशीब चांगलं असल्याचं सांगितलं, तर काहींनी सीटबेल्ट खरंच महत्वाचा असल्याचं मान्य केलं आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज देखील मिळाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात