मुंबई 12 मे : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ आपल्या समोर येत असतात. हे व्हिडीओ आपल्याला कधी हसवतात तर कधी आपल्याला विचार करायला भाग पाडतात. तर काही व्हिडीओ हे अंगावर काटा आणणारे असतात. पण त्यांपैकी काही व्हिडीओ हे खरे असतात, तर काही व्हिडीओ हे तयार केले गेले असतात. जे लोकांची कधी-कधी दिशाभूल देखील करतात. मधल्या काळात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत होता. ज्यामध्ये रस्त्यावर चालनाऱ्या सफेद कारला अचानक आपघात होतो आणि ती हवेत मागे येऊ लागते. कोणतीही गाडीमध्ये नसताना असं कसं घडलं? असा प्रश्न सगळ्यांना पडला, ज्यामुळे लोक हा व्हिडीओ आपल्या मित्रांना पाठवू लागले ज्यामुळे हा व्हिडीओ जोरदार ट्रेंड देखील होऊ लागला होता. गर्लफ्रेंडला ट्रॉलिमधून वाऱ्याच्या वेगानं फिरवून सोडून दिलं आणि घडलं भयंकर अनेकांचं म्हणणं होतं की भूतप्रेतामुळे हे घडलं आहे. तिथे अशि कोणतीतरी वेगळी शक्ती होती ज्यामुळे कारला असा विचित्र अपघात घडला. पण सध्या सोशल मीडियावर याची पोलखोल करणारा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे की हा अपघात नेमका कशामुळे झाला? व्हायरल होत असलेला बनावट व्हिडीओ
हा भूतप्रेत नसून तेथे एक कार होती, जिला ठोकल्यामुळे या सफेद कारचा अपघात झाला. पण लोकांची दिशाभूल करण्यासाठी कोणीतरी तो व्हिडीओ एडिट करुन टाकला होता. Video : पिंजऱ्यात तरुणाची एन्ट्री होताच सिंहिणीचा हल्ला, पुढे घडलेला प्रकार हृदयाचे ठोके चुकवणारा तुम्ही या अपघाताचा खरा व्हिडीओ नीट पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की, दुसऱ्या बाजूने येणाऱ्या काळ्या गाडीमुळे या सफेद कारची अशी अवस्था झाली, ज्यामुळे ही कार मागे फेकली गेली. या बनावट व्हिडीओ मागचं सत्य दाखवणारा व्हिडीओ
सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आहे. खरंतर खोटा आणि खरा असे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात पाहिले जात आहेत.