मुंबई 4 सप्टेंबर : इंटरनेटचं जग म्हणजे माहितीचा खजाना आहे. येथे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला शिकायला मिळतात. एवढंच काय तर येथे आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधी खूपच मजेदार असतात. तर काही व्हिडीओ आपल्याला माहिती पुरवणारे असतात. ऐवढंच नाही तर काही व्हिडीओ हे उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये स्टाईल मारणाऱ्या आणि मोठेपणा करणाऱ्या व्यक्तीला चांगलीच अद्दल घडली आहे. या व्यक्तीची सगळीच अकड बाहेर निघालेली पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये पाऊस पडताना दिसत आहे. ज्यामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे, ज्यामुळे रस्त्यावरील नाले देखील वाहू लागले आहेत. ज्यामुळे तेथून जाण्यासाठी बॉस त्याच्या कर्मचाऱ्याला आदेश देतो की, मला रस्ता पार करण्यासाठी तेथे काहीतरी ठेव. ज्यामुळे हा कर्मचारी त्या पाण्यात उतरुन तेथे लाकडाचा एक प्लॅटफॉर्म ठेवतो. हे वाचा : सुसाट बाईकवर हातापायाची घडी घालून निवांत बसला; 25 सेकंदातच…; धडकी भरवणारा VIDEO या प्लॅटफॉर्म पार करताना हा बॉस अगदी स्टाईलमध्ये चालत येतो. परंतू तेवढ्यातच त्याचा पाय सरकतो आणि हा व्यक्ती अखेर पाण्यात पडतो.
Boss did not want to get his foot wet and asked the employee to put a pallet 😊 pic.twitter.com/cI1fXWGrnV
— Tansu Yegen (@TansuYegen) August 29, 2022
या बॉसला जेथे पाण्यात पाय भिजवायचे नव्हते, तेथे तो पूर्णच ओला झाला आहे. ज्यामुळे रस्त्याच्या मधोमध या व्यक्तीचा खूप मोठा अपमान झाला आहे. हे वाचा : Video : वेळ वाचवण्यासाठी एस्केलेटरवरून सोडली बॅग, खाली उभ्या असलेल्या महिलेसोबत भयंकर घडलं खरंतर त्याने कर्मचाऱ्याला दिलेल्या या वागणूकीमुळे त्याच्यावर अशी वेळ आली आहे आणि ज्यामुळे त्याला भयंकर अपमानाला सामोरे जावे लागले. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ ट्वीटर अकाउंटवर Tansu YEĞEN नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडीओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. एवढेच नाही तर हजारो लोकांनी व्हिडीओला लाईक आणि रिट्विटही केलं आहे. कमेंट सेक्शनमध्येही अनेक लोक मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसले.