मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सुसाट बाईकवर हातापायाची घडी घालून निवांत बसला; 25 सेकंदातच...; धडकी भरवणारा VIDEO

सुसाट बाईकवर हातापायाची घडी घालून निवांत बसला; 25 सेकंदातच...; धडकी भरवणारा VIDEO

बाईकचं हँडल सोडून स्टंट करणं पडलं भारी.

बाईकचं हँडल सोडून स्टंट करणं पडलं भारी.

वेगवान बाईकवरील पूर्ण नियंत्रण सोडून स्टंट करणाऱ्या बाईकस्वाराचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 02 सप्टेंबर : बाईक स्टंटचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कुणी बाईकच्या हँडलवरील दोन्ही हात सोडून, कुणी बाईकवरून झोपून तर काही जण उभे राहून स्टंट करताना दिसतात. बाईकवरील फिल्मी हिरोसारखी स्टाइल मारणं जीवघेणंही ठरू शकतं. असाच एक बाईक स्टंटचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

साध्या सायकलच्या हँडल किंवा पँडलवरील नियंत्रण सुटलं तरी सायकल डगमगते आणि तोल जाऊन आपण खाली पडतो. बाईकचं वजन तर सायकलपेक्षा किती तरी अधिक असतं. शिवाय रस्त्यावर सुसाट वेगाने बाईक पळवताना त्याचं नियंत्रण सांभाळणंही आव्हानात्मक असतं. पण काही लोक हिरोगिरीच्या नादात चालत्या बाईकचं हँडल सोडतात. या व्हिडीओतील व्यक्तीनेही तेच केलं. फक्त हातच नव्हे तर त्याने पायाचाही बॅलेन्सही सोडून दिला.

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती बाईकवर निवांत बसलेला दिसतो आहे. त्याच्यासोबत दुसरा कोणताच प्रवासी किंवा चालक नाही. तो एकटाच बाईकवर आहे. ना त्याने बाईकचं हँडल धरलं आहे ना पाय खाली सोडले आहेत. हात आणि पायांची घडी घालून तो बाईकवर शांतपणे बसला आहे आणि बाईक चालकाशिवाय सुसाट अशीच चालते आहे. बाईकवर कुणाचंच नियंत्रण नाही.

हे वाचा - VIDEO - गर्दी म्हणून चालत्या बसबाहेर लटकले; 8 सेकंदात जे घडलं ते पाहून धडकी भरेल

त्याच्या बाजूने जाणाऱ्या इतर गाड्यांमधील प्रवासीही त्याला पाहून हैराण होतात. अशाच प्रवाशांपैकी एकाने त्याचा व्हिडीओ शूट केला. त्यांच्याशी बोलण्यातही तो गुंतून जातो. त्याचं लक्ष समोर बिलकुल नसतं. इतक्याच अचानक समोर एक मोठी गाडी येते आणि तो स्वतःला बाईकसह सावरणार तोच धाडकन त्या गाडीला आपटतो. गाडीच्या मागील भागेच्या खिडकीच्या काचेतून त्याचं डोकं आत जातं. आणि तो बाईकवरच उभा राहतो.

पाहताच हा अपघात किती भयंकर आहे ते समजतं. या व्यक्तीला नक्कीच गंभीर दुखापत झालेली असावी. त्याला रुग्णालयात दाखल कऱण्याची वेळ आली असावी.

हे वाचा - चौकात घडला दुचाकीचा अपघात, दोन बाईक एकमेकांना अशाकाही धडकल्या की... पाहा VIDEO

@YoufeckingIdiot ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या 44 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. तर काही जणांना हसूही आवरलं नाही. त्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंटही केल्यात आहेत. कमेंट बॉक्समध्येच एका युझरने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ इजिप्तचा आहे. पण नेमका हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे, हे न्यूज 18 लोकमतला माहिती नाही.

First published:

Tags: Accident, Bike, Bike accident, Road accident, Shocking video viral, Viral, Viral videos