नवी दिल्ली 08 जून: सध्याच्या काळात सोशल मीडिया हे एक असं माध्यम बनलं आहे, जे रातोरात एखाद्याचं नशीबच बदलून टाकतं. रानू मंडलपासून बाबा जॅक्शनपर्यंत अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. अशात आता आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. या व्हिडिओमधील वृद्धाची कला पाहून तुम्हीही व्हिडिओ शेअर केल्याशिवाय राहाणार नाही. नवरदेवाच्या चपला चोरण्याऐवजी मेहुण्यांनी…; VIDEO पाहून हसू आवरणार नाही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती अत्यंत सुंदर पद्धतीनं व्हायोलिन (Violin) वाजवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी या व्यक्तीचे फॅनच झाले आहेत. या आर्टिस्टचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, व्हिडिओ शेअर करणाऱ्यानं असा दावा केला आहे, की हा व्यक्ती कोलकातामधील आहे. हा व्यक्ती लॉकडाऊनमध्ये व्हायोलिन वाजवून लोकांचं मनोरंजन करतो.
VIDEO:28 बायका, 135 मुलं अन् 126 नातवंडांसमोर 37व्या वेळी बोहल्यावर चढला नवरदेव व्हिडिओमध्ये दिसतं, की एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला व्हायोलिनवर अजीब दास्तां है ये आणि दीवाना हुआ बादलसारखी गाणी वाजवत आहे. तो हे इतक्या सुंदर पद्धतीनं वाजवत आहे, की व्हिडिओ पाहून लोकंही थक्क झाले आहेत आणि कमेंट करून ते या वृद्ध आजोबांचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर @aarifshaah नावाच्या एका युजरनं शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, की या वृद्ध व्यक्तीचं टॅलेंट पाहा. हा व्हिडिओ अनेकांना लाईक आणि शेअर केला आहे.

)







