नवी दिल्ली 08 जून : सोशल मीडियावर अनेकदा विनोद, काही थक्क करणारे तर काही मनोरंजन करणारे व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. मात्र, काही व्हिडिओ असे असतात जे आपल्याला हैराणही करतात आणि तितकेच विनोदीही वाटतात. आता असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनं लोकांना केवळ हैराण केलं नाही तर हा विचार करण्यासही भाग पाडलं आहे, की खरंच असं होऊ शकतं का? आता तुम्हीही असा विचार करत असाल, की या व्हिडिओमध्ये असं नेमकं काय आहे. तर, या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबासमोर 37 व्या वेळी लग्नबंधनात (Marriage) अडकत असल्याचं दिसतं. कत्ल की रात है। 5 मिनिटासाठी ऑक्सिजन बंद अन् 22 रुग्णांचा मृत्यू; VIDEO VIRAL सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक वयस्कर व्यक्ती विवाहबंधनात अडकत असल्याचं दिसत आहे. पहिल्या नजरेत तर हे सगळं सामान्य वाटतं. मात्र, जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा लोकही हैराण होत आहेत. असं समोर येत आहे, की हा व्यक्ती 37 व्या वेळी नवरदेव झाला आहे. याआधी या व्यक्तीनं 36 वेळा लग्नगाठ बांधली आहे. इतकंच नाही तर त्याला अनेक मुलं आणि नातवंडेही आहेत. त्यामुळे, व्हायरल झालेला हा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे.
BRAVEST MAN..... LIVING
— Rupin Sharma IPS (@rupin1992) June 6, 2021
37th marriage in front of 28 wives, 135 children and 126 grandchildren.👇👇 pic.twitter.com/DGyx4wBkHY
सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर इंडियन पोलीस सर्व्हिसचे अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं, की 28 बायका, 135 मुलं आणि 126 नातवंडांच्या उपस्थितीत हा व्यक्ती 37 व्या वेळी लग्न करत आहे. खूपच शूर आहे हा व्यक्ती. व्हिडिओमध्ये या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यही अत्यंत आनंदात दिसत असून ते नव्या नवरीचं मोठ्या उत्साहानं स्वागत करत आहेत. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून लोक यावर मजेशीर कमेंट करत आहेत.

)







