VIDEO: 6 वर्षांच्या मुलानं दुसऱ्यांदा मृत्यूला हरवलं, फुफ्फुसाच्या आजारानंतर आता कोरोनावर मात

VIDEO: 6 वर्षांच्या मुलानं दुसऱ्यांदा मृत्यूला हरवलं, फुफ्फुसाच्या आजारानंतर आता कोरोनावर मात

6 वर्षांच्या मुलाची आयुष्याशी झुंज यशस्वी. फुफ्फुसाच्या आजारानंतर आता कोरोनाला हरवलं.

  • Share this:

क्लार्क्सव्हिल, 06 एप्रिल : कोरोनाने साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. जगभरात तब्बल 12 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनाने जवळजवळ 65 हजार लोकांचा जीव घेतला आहे. यात सर्वात वाईट परिस्थिती सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेतील 3 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असले तरी अमेरिकेत 14 हजारहून अधिक लोकं निरोगी झाले आहेत. अशाच एका अमेरिकेतील क्लार्क्सव्हिल शहरात राहणाऱ्या एका 6 वर्षांच्या मुलाने कोरोनावर मात केली आहे.

जोसेफ बोस्टेन नावाच्या या 6 वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. महिनाभर त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर निरोगी होऊन जोसेफ घरी परतला. मुख्य म्हणजे अशा भयंकर आजारावर मार करण्याची जोसेफची ही पहिली वेळ नाही. याआधी त्यानं सिस्टिक फायब्रॉसिस हा गंभीर आजारावर मात केली होती.

वाचा-काळजात घर करेल असा PHOTO VIRAL, वाचा यामागची अंगावर शहारे आणणारी कहाणी

वाचा-माणसातला देव! घरच्यांनी साथ सोडली, तरी डॉक्टरांनी रुग्णाला हातांनी भरवलं जेवण

कोरोनावर मात करत घरी परतलेल्या जोसेफनं आईच्या फेसबुकवरून एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मी जिंकलो, मी जिंकलो असे जोसेफ ओरडत आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहून लोकांनी, असा आदर्श घ्यावा अशा कमेंट केल्या आहेत.

याआधी जोसेफला सिस्टिक फायब्रॉसिस हा फुफ्फुसांचा अनुवांशिक आजार झाला होता. या जीवघेण्या आजाराला हरवल्यानंतर जोसेफनं कोरोनावरही मात केली. त्यामुळं सोशल मीडियावर त्याला डेथ किंग म्हटलं जात आहे. जोसेफला सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसल्यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांनंतर त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

वाचा-सलाम!250 किमी प्रवास करून रुग्णसेवा करण्यासाठी पोहोचली 8 महिन्यांची गर्भवती नर्स

सध्या अमेरिकेत कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनामुळं अमेरिकेत सध्या भयंकर परिस्थिती आहे. येत्या दोन आठवड्यात ही परिस्थिती आणखी चिघळण्याचे संकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी दिले आहेत.

First published: April 6, 2020, 12:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading