चेन्नई, 05 एप्रिल : कोरोनाविरुद्धच्या युद्धात सध्या सारं जग एकत्र आलं आहे. वैद्यकिय कर्मचारी या लढ्यात दिवसरात्र मेहनत करत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करण्याचे काम सध्या डॉक्टर आणि परिचारिका करत आहेत. या सगळ्यात एका डॉक्टरांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये डॉक्टर स्वत:च्या हाताने रुग्णाला जेवण भरवताना दिसत आहे. सोशल मीडियावर या फोटो व्हायरल झाल्यानंतर, रुग्णाचे नातेवाईक येऊ शकले नाही. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी या रुग्णाला स्वत:च्या हातांनी जेवण भरवले. हा फोटो पाहून लोकांनी डॉक्टर खरे हिरो आहेत, अशी प्रतिक्रीया दिली आहे. वाचा- एकीकडे 12 हजार लोकांचा मृत्यू, तरी स्पेनमधील ‘या’ शहराने रोखला कोरोना ट्विटरवर हा फोटो अरुण जनार्दनन यांनी शेअर केला आहे. त्यांनी हा फोटो शेअर करताना, “जर रुग्णाचे नातेवाईक येऊ शकले नाही तर डॉक्टर (मद्रास मेडिकल मिशनचे ज्येष्ठ नेफ्रोलॉजिस्ट) जॉर्जियन अब्राहम यांनी रुग्णाला स्वत:च्या हातांनी जेवण भरवले”, असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या डॉक्टरांचे कौतुक केले आहे. वाचा- सलाम!250 किमी प्रवास करून रुग्णसेवा करण्यासाठी पोहोचली 8 महिन्यांची गर्भवती नर्स
वाचा- Lockdown चा कंटाळा आलाय? या 8 शॉर्ट फिल्म ठरतील मनोरंजनाचा चांगला पर्याय 8 महिन्यांची गर्भवती नर्स मदतीसाठी पोहोचली 250 किमी लांब असणाऱ्या दवाखान्यात तामिळनाडूमधील ही घटना आहे. विनोथिनी या पेशाने नर्स असणाऱ्या 8 महिन्यांच्या गर्भवती आहेत. त्या कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी तिरुचिरापासून रामनाथपूरमपर्यंत 250 किमीचा प्रवास करून पोहोचल्या आहेत. त्याठिकाणी त्या आपली सेवा नेटाने पार पाडत आहेत. 25 वर्षांच्या विनोथिनी त्रिचीमध्ये एका खाजगी दवाखान्यात नर्स आहेत, पण सध्याची परिस्थिती पाहता त्यांना कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी ड्यूटी लावण्यात आली.