Home /News /viral /

रस्त्यावर मेलेल्या कुत्र्यांचं मांस खाताना दिसला तरुण, काय आहे या VIDEO मागची कहणी

रस्त्यावर मेलेल्या कुत्र्यांचं मांस खाताना दिसला तरुण, काय आहे या VIDEO मागची कहणी

जयपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर दिल्ली-जयपूर-अजमेर बायपासचा हा व्हिडिओ आहे.

    नवी दिल्ली, 22 मे:देशभरात कोरोनाचं थैमान सुरू असल्यानं लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे धंदा-पाणी बंद झालं, हातातलं कामही गेलं, हातात पैसे नसल्यानं राहण्याची आणि खाण्याची आभाळ होऊ लागली. त्यामुळे मजूर आणि हातावर पोट असणाऱ्या परप्रांतीयांनी आपल्या मूळ गावची वाट धरली. रस्त्यानं पायी जाणाऱ्या मजुरांचे हाल कसे होत आहेत याचं भीषण वास्तव दिवसेंदिवस अधिक समोर येत आहे. सरकारकडून आणि सामाजिक संस्थांकडून मिळणारी मदतही अपुरी पडते की काय हे असे व्हिडीओ किंवा फोटो समोर आल्यावर वाटू लागतं. अंगावर काटा आणणारा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावरील अपघातात मेलेल्या कुत्र्याचं मांस खाताना हा तरुण दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नसल्यानं त्याच्यावर ही वेळ आली आहे. हा व्हिडीओ पाहून तरुणाचे होत असलेले हाल आणि पायी जाणाऱ्या तरुणाचे भोग काय आहेत हे सांगणारा आहे. हे वाचा-घर गाठण्यासाठी उपाशीपोटी 780 किमी चालला मजूर, 10 दिवसांनी समोर दिसलं घर पण... प्रधुम्न सिंह नरुका नावाच्या तरुणानं हा व्हिडीओ अपलोड केला आहे. thelallantop ने दिलेल्या वृत्तानुसार जयपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर दिल्ली-जयपूर-अजमेर बायपासचा हा व्हिडिओ आहे. प्रधुम्न यांनी या तरुणाची चौकशी केली. या तरुणाला नीट काही सांगता येईना. या तरुणाकडे पाहून तो मनोरुग्ण आहे असं वाटत नव्हतं. पण भुकेमुळे त्याची अवस्था खूप खराब झाल्याचं दिसत होतं. त्यांनी या तरुणाला खायला बाजूला बोलवून खायला दिलं आणि या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली आहे. सध्या या तरुणाचा शोध सुरू आहे. हा मजूर आहे की मनोरुग्ण याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणाचा तपास सुरू आहे. हे वाचा-धक्कादायक! युवकाला केली बेदम मारहाण, गळ्यात 40 किलोचा दगड बांधून गावभर फिरवलं संपादन क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या