जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Lockdown मध्ये भूतदया! साथ देणाऱ्या मुक्या प्राण्याची वृद्ध महिला अशी घेतेय काळजी

Lockdown मध्ये भूतदया! साथ देणाऱ्या मुक्या प्राण्याची वृद्ध महिला अशी घेतेय काळजी

Lockdown मध्ये भूतदया! साथ देणाऱ्या मुक्या प्राण्याची वृद्ध महिला अशी घेतेय काळजी

सध्याच्या संकटात माणसांची अवस्था वाईट असताना महिला कुत्र्याच्या पिलाची घेत असलेली काळजी पाहून लोकही भावनिक झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 मे : कोरोनाचं संकट जगातील जवळपास 200 पेक्षा जास्त देशांवर ओढावलं आहे. या साथीच्या आजाराला रोखण्याचं आव्हान जगासमोर आहे. यासाठी भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यातच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे लोक भावुक झाले आहेत. यात एक वृद्ध महिला तिच्या पाठीवर एक लहान कुत्र्याचं पिल्लू घेऊन चालताना दिसते. व्हायरल होत असलेल्या महिलेच्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या जात आहेत. एका युजरनं म्हटलं आहे की, पिल्लू लवकर थकतं. माझ्यासोबतच ते असतं… याला सोडू शकत नाही. गेल्या दोन दिवसांपासून हे सुरू आहे. फोटोत दिसतं की वृद्ध महिलेच्या हातात बरंच साहित्य आहे. त्याशिवाय डोक्यावर एक गाठोडं असून त्यावर एक कुत्र्याचं लहान पिल्लू बसलं आहे. सध्याच्या संकटात माणसांची अवस्था वाईट असताना महिला कुत्र्याच्या पिलाची घेत असलेली काळजी पाहून लोकही भावनिक झाले आहेत.

जाहिरात

आयपीएस अधिकारी विजय कुमार यांनीही फोटो ट्विट केला आहे. त्यांनी म्हटलं की, स्वत: अडचणीत असतानाही दया दाखवणं खूप काही शिकवतं. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

एकाने म्हटलं की, हेच असतं आईचं प्रेम. सर्वांसाठी लॉकडाऊन एकसारखं नाही. हा फोटो कधीचा आणि कुठला आहे याची माहिती मात्र अद्याप मिळालेली नाही. हे वाचा : Amphan Cyclone : वादळात उडाली शेड आणि बराच वेळ उडत राहिल्या ठिणग्या, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात