ब्रिटन, 02 डिसेंबर: जेव्हा कोणी प्रेमात ( love) पडतं, तेव्हा त्या व्यक्तीचं वय ( age) पाहिलं जात नाही. आता ब्रिटनमध्ये ( Britain) असलेल्या 81 वर्षीय आयरिस जोन्स ( Iris Jones) यांचंच घ्या. त्या स्वतःपेक्षा 45 वर्षांनी लहान असलेल्या मोहम्मद अहमदच्या ( Mohammed Ahmed) फक्त प्रेमातच पडल्या नाहीत, तर त्याच्यासोबत लग्नही ( married) केलं. मोहम्मद इजिप्तमध्ये ( Egypt) राहत होता. त्याला नुकताच ब्रिटनचा व्हिसा ( UK visa) मिळाला आणि आयरिस यांच्याशी त्याची भेट झाली. अलीकडेच एका टीव्ही चॅनेलवर या दोघांची मुलाखत झाली असून, त्यामध्ये त्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनावर भाष्य केलं आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
81 वर्षीय पेन्शनर आयरिस जोन्स आणि 36 वर्षीय मोहम्मद इब्राहिम यांचं प्रेम चर्चेत आहे. मुलाखतीसाठी पहिल्यांदाच हे जोडपं आयटीव्ही (ITV) या ब्रिटिश चॅनेलच्या स्टुडिओमध्ये एकत्र पोहोचलं. 'दिस मॉर्निंग' या चॅनेलच्या लोकप्रिय शोमध्ये दोघांनी वयातलं अंतर, पुनर्मीलन आणि सेक्स लाइफवर होणाऱ्या टीकेबाबत अनेक गोष्टी सांगितल्या इजिप्तचा मोहम्मद नोव्हेंबर महिन्यापर्यंत इजिप्तमध्ये राहत होता आणि पत्नी ब्रिटनमध्ये होती. जेव्हा मोहम्मदला व्हिसा मिळाला तेव्हा त्याने आयरिस यांना भेटायला अजिबात उशीर केला नाही. आयरिस यांनी सांगितलं, की 'लॉकडाउनमुळे आणि व्हिसा न मिळाल्याने दोघांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं.'
हेही वाचा- भलतीच हौस! 11 वेळा लग्न करुनही समाधान नाहीच; आता नवा नवरदेव शोधतीये 52 वर्षीय महिला
मोहम्मद म्हणाला, 'व्हिसा मिळाल्यानंतर मला वाटत होतं, की मी हवेतच उडत आहे. तेव्हा मी रस्त्यावरचं जोरात ओरडायला सुरुवात केली. काही जण मला वेडा समजत होते; पण मी आनंदात होतो. कारण मी माझ्या पत्नीला भेटणार होतो.' मोहम्मद यूकेमध्ये पोहोचताच विमानतळावर दोघे एकमेकांना भेटले.
आयरिस यांनी सांगितलं, की, 'प्रेम सर्वांवर विजय मिळवतं. मोहम्मद खूप चांगला आहे. आम्ही दोघेही आमचा पहिला ख्रिसमस एकत्र साजरा करण्याचा विचार करत आहोत.'
आयरिस मोहम्मदसोबतच्या सेक्स लाइफबद्दल आनंदी आहेत. लव्ह मेकिंगलाही त्या नात्याचा महत्त्वाचा भाग मानतात.
हेही वाचा- OMG! तळहाताच्या मागील बाजूवर ठेवली इतकी अंडी की बनवलं वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा अनोखा VIDEO
आयरिस जोन्स आणि मोहम्मद अहमद यांची लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत आहे. प्रेमाला वयाचं आणि ठिकाणाचं बंधन नसतं, हेच या दोघांच्या जोडीतून दिसून येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news