नवी दिल्ली 02 डिसेंबर : भारतात लग्न (Indian Wedding) करणे हा अतिशय मोठा निर्णय मानला जातो. अमेरिकेत मात्र एका 52 वर्षाच्या महिलेनं आतापर्यंत 11 वेळा लग्न केलं आहे. इतकंच नाही तर ती आता आपल्यासाठी नवीन नवरदेव शोधत आहे. या महिलेनं आतापर्यंत 9 वेगवेगळ्या पुरुषांसोबत लग्न केलं आहे (Woman Addicted To Marriage).
'मिरर यूके'च्या वृत्तानुसार, अमेरिकेत राहणारी मोनेट नावाची महिला लहानपणीपासूनच पुरुषांच्या प्रेमात वेडी आहे. मोनेटला लग्नाचं वेड लागलं आहे. मोनेटने सांगितलं की ती जेव्हा लहान होती, तेव्हा तिला आपल्या भावांचे मित्र खूप आवडायचे आणि ती त्यांच्यासोबत लग्न करण्याचा विचार करायची. मोनेटनं पहिलं लग्न हायस्कूलमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत तिनं ९ वेगवेगळ्या मुलांसोबत ११ वेळा लग्न केलं (Woman Married 11 Times) आहे. तिचं कोणतंही लग्न अधिक काळ टिकू शकलं नाही. सध्या मोनेट आपल्या बाराव्या पार्टनरच्या शोधात आहे.
मोनेटचं वय सध्या 52 वर्ष आहे. TLC न्यूज चॅनेलसोबत बोलताना तिनं सांगितलं, की आतापर्यंत तिला 28 लोकांनी लग्नासाठी विचारलं आहे. मोनेटचं म्हणणं आहे की ती यापेक्षाही जास्त लोकांसोबत लग्न करू शकते. तिचं असं म्हणणं आहे की वारंवार लग्न तुटल्याने ती अजिबातही नाराज नाही. सध्या मोनेट 57 वर्षाच्या जॉनला डेट करत आहे. मागील दोन वर्षापेक्षा अधिक काळाहून ती त्याच्या प्रेमात आहे. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिने दोन वेळा जॉनसोबत लग्न करून त्याला घटस्फोटही दिला आहे. आता पुन्हा तिला जॉनसोबत लग्न करण्याची इच्छा आहे. या नात्याबाबत बोलताना जॉनने सांगितलं की ते दोघे ऑनलाईन एकमेकांना ओळखू लागले. दोनवेला मोनेटसोबतचं नातं तुटूनही ते मोनेटसोबत बारावं लग्न करायला तयार आहेत.
आपल्या आधीच्या पतींबाबत बोलताना मोनेट सांगते, की तिचा पाच नंबरचा पती सर्वात चांगला होता. तर सहा नंबरच्या पतीचा स्वभाव खूप चांगला होता. यामुळे त्यांनी तिच्यासोबत दोनवेळा लग्न केलं. आठ नंबरचा पती तिला ऑनलाईनच मिळाला होता. तर, दहा नंबरचा पती शाळेपासूनत तिच्या ओळखीचा होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love story, Wedding