Home /News /viral /

लग्नातच नवरदेवानं नवरीला असं Surprise Wedding gift; Video पाहून तरुणी म्हणतील, 'घो मला असला हवा गं बाई'

लग्नातच नवरदेवानं नवरीला असं Surprise Wedding gift; Video पाहून तरुणी म्हणतील, 'घो मला असला हवा गं बाई'

नवरदेवाने नवरीला दिलेलं गिफ्ट पाहून लग्नात आलेले सर्वजण सरप्राइझ झाले.

  मुंबई, 02 डिसेंबर : लग्नाचा (Wedding video) क्षण हा प्रत्येकासाठी एक अनमोल क्षण असतो. हा क्षण कायम लक्षात राहावा यासाठी काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न वर-वधू (Bride and groom video) आणि त्यांच्या कुटुंबाचा किंवा नातेवाईकांचा असतो. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. नवरा-नवरी तर लग्नात एकमेकांना सरप्राईझ (Surprise gift) देण्याची संधी सोडत नाहीत (Wedding gift). अशाच एका लग्नातील सरप्राईझचा व्हिडीओ समोर आला आहे (Groom surprise wedding gift to bride). नवरा-नवरीला तुम्ही सरप्राईझ डान्स करताना पाहिलं असेल. पण या व्हिडीओतील नवरदेवाने आपल्या नवरीला एक सरप्राईझ गिफ्ट दिलं आहे. लग्नातच सर्वांसमोर त्यांना हे गिफ्ट दिलं. जे पाहून नवरीसह उपस्थित सर्वजण पाहतच राहिले. खरंतर या नवऱ्याने नवरीला जे गिफ्ट दिलं ते पाहून काही तरुणी तर मलाही असाच नवरा हवा, असंच म्हणतील.
  आता तुम्ही म्हणाल नक्की या नवरदेवाने असं काय गिफ्ट दिलं. ते आता तुम्ही व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला समजेल. चला तर पाहुया व्हिडीओ. हे वाचा - DJ चा आवाज ऐकताच नवरदेव छतावर चढून करू लागला डान्स, घरचेही हैराण, VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की नवरा-नवरी एकमेकांसमोर उभे आहेत. नवरी समोर येताच नवरदेव तिच्या हातात एक गिफ्ट बॉक्स ठेवतो. नवरी उत्सुकतेने तो बॉक्स उघडते आणि त्यात असतो चक्क आयफोन. नवरदेव आपल्या नवरीला आयफोन गिफ्ट करतो. गिफ्ट पाहताच नवरीच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा होतो. ती आनंदाने नवऱ्याला मिठीच मारते. ट्रेंडिंग दुल्हनिया इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जेव्हा तुम्हाला लग्नाचं गिफ्ट म्हणून आयफोन मिळतो, त्यापेक्षा दुसरा आनंद नाही. तुम्ही तुमच्या नवरदेवाला हा व्हिडीओ टॅग करा, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं. हे वाचा - लग्नात सप्तपदीआधी नवरीबाईची भलतीच डिमांड; Wedding video पाहून डोक्याला लावाल हात हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बऱ्याच तरुणींनी आपल्या मनात अशा नवऱ्याची स्वप्नं रंगवायला सुरुवात केली असेल. या व्हिडीओवरही कमेंट करताना काही तरुणींनी आपल्याला असा नवरा हवा अशी इच्छाही व्यक्त केली आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या