जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! तळहाताच्या मागील बाजूवर ठेवली इतकी अंडी की बनवलं वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा अनोखा VIDEO

OMG! तळहाताच्या मागील बाजूवर ठेवली इतकी अंडी की बनवलं वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा अनोखा VIDEO

OMG! तळहाताच्या मागील बाजूवर ठेवली इतकी अंडी की बनवलं वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा अनोखा VIDEO

सोशल मीडियावर जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीजवळ अंड्याचा ट्रे ठेवलेला आहे. हा व्यक्ती अतिशय कमालीची ट्रिक वापरून आपल्या तळहाताच्या उलट्या बाजूला 18 अंडी ठेवतो

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 02 डिसेंबर : जगात अनेक अजब लोक आहेत, जे सामान्य माणसापेक्षा अगदी वेगळे असतात. काही लोक असेही असतात जे प्रसिद्ध (World Famous) होण्यासाठी अतिशय अनोखं काम करतात. प्रसिद्ध होण्याची इच्छा लोकांना काहीतरी वेगळं करत राहण्याची प्रेरणा देते. काही लोक आपल्या या अनोख्या कामांमुळे वर्ल्ड रेकॉर्डही नावी करतात. काही लोक स्वतःच्याच कामाचं कौतुक करत राहतात. तर काही लोक असेही असतात ज्यांच्या कामाचं कौतुक जगभरात लोक करतात. असाच एक व्यक्ती सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे, त्याच्या कामाचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकनेही कौतुक केलं आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकने (Guinness World Record Book) या व्यक्तीचा एक असा व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहून तुम्हालाही डोळ्यावर विश्वास बसणार नाही. सोशल मीडियावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीजवळ अंड्याचा ट्रे ठेवलेला आहे. हा पांढऱ्या रंगाचा टीशर्ट घातलेला व्यक्ती अतिशय कमालीची ट्रिक वापरून आपल्या तळहाताच्या उलट्या बाजूला 18 अंडी ठेवतो (Eggs on Back of Palm). व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या व्यक्तीने इतकी जबरदस्त ट्रीक वापरली की आपल्या हाताच्या मागील बाजूला त्याने 18 अंडी अगदी आरामात ठेवली. व्हिडिओ पाहताना सुरुवातीला असं वाटतं, की इतकी अंडी कोणीही आपल्या उलट्या हातावर सहज ठेवू शकतं. मात्र पुढे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नंतर समजेल की हा टास्क अतिशय अवघड आहे.

जाहिरात

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या व्यक्तीचं नाव इब्राहिम सादिक (Ibrahim Sadeq) असं आहे. तो इराकमधील रहिवासी आहे. त्याची अनोखी ट्रिक पाहून अनेकजण हैराण झाले आहे. लोकांना प्रश्न पडला आहे, की हाताच्या उलट्या बाजूला इतकी अंडी कोणी कसं ठेवू शकतं. या व्हिडिओवर लोक निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात