मुंबई, 21 एप्रिल : कोरोनापासून सुरक्षा म्हणून सध्या सर्वजण घरी आहे. काही लोक सोशल मीडियावर तर काही लोक ऑनलाइन गेम खेळून आपला टाइमपास करताना दिसत आहेत. याशिवाय लॉकडाऊनमध्ये लोक Tik Tok वर सुद्धा खूप सक्रिय झाले आहेत. सध्या अनेकजण टिक टॉक वर व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. मात्र अशात एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ माजली असून हा व्हिडीओ आतापर्यंतचा सर्वात खतरनाक व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याच्या घरी एकटाच टिक-टॉक व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. या युजरचं नाव रुबेन क्यूब असं आहे. रुबेननं त्याचा डान्स व्हिडीओ नुकताच टिक-टॉकवर शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यावर जे सत्य समोर आलं ते फारच धक्कादायक आहे. या युजरनं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, मी घरी एकटाच आहे आणि मी माझा डान्स रेकॉर्डिंग केला आहे.
रामायणच्या सीतेला साकारायची आहे निर्भयाच्या आईची भूमिका, कारण वाचून कराल सॅल्यूट
@reubix_cubelmao i’m home alone so i learned a tiktok dance. lov u doja but what has my life come to? ##musiclives ##positivevibes ##sayso ##qurantine ##boredathome ♬ Say So - Doja Cat
या व्हिडीओमध्ये रुबेन डान्स करताना दिसत आहे आणि त्याच्या मागे त्याच्या घरातील जिना दिसत आहे. या जिन्यावर वरच्या बाजूला कोणाचे तरी दोन डोळे आणि सावलीसारखं काहीतरी दिसत आहे. काही वेळातच ही सावली आणि डोळे तिथून गायब होतात. हा व्हिडीओ समोर आल्यावर त्यावर अनेकांना कमेंट केल्या आहेत. काहींनी याला भूत म्हटलं आहे तर काहींनी ती मांजर असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी मात्र हा तरुण घरी एकटा असल्याचं खोटं बोलत आहे असं म्हटलं आहे.
बॉलिवूड स्टार्सची स्टाइल 10 वर्षांपूर्वी होती अशी, PHOTOS पाहून पोट धरुन हसाल
कमेंट बॉक्समध्ये रुबेननं सुद्धा उत्तर दिलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर रात्रभर मला सुद्धा झोप आली नव्हती असं त्यानं म्हटलं आहे. त्यानं सांगितलं की त्याच्याकडे कोणताही पाळीव प्राणी नाही आहे. याशिवाय तो कोणत्याही शहरात राहत नाही तर त्याचं घर एक कब्रस्तानाच्या जवळ आहे.
Lockdown मध्ये या बॉलिवूड स्टार्सनी आठवले जुने दिवस आणि शेअर केले HOT PHOTOS
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Tiktok viral video