अभिनेता सुनील शेट्टीची त्यावेळी सिनेमांमध्ये विस्कटलेले केस, अर्धवट उघडलेलं शर्ट आणि ढगाळ कपडे अशी स्टाईल होती. अनेक वर्ष त्यांनी याच लुकला फॉलो केलं. पण नंतर हळूहळू स्टाईलमध्ये असा बदल केला की सुनीलने हॉलिवूड सेलिब्रिटींनाही टक्कर दिली. दाढी आणि केसांच्या बाबतीत त्यांचा क्लासिक लुक आजही प्रसिद्ध आहे.
सुरुवातीपासून जास्त प्रमाणात गंभीर चित्रपट केल्यामुळे बहुतेक जास्त काळ अजय देवगणचा लुक कायम असाच दिसायचा. अभिनेता अजय देवगणने त्याकाळी फार छान चित्रपट केले. पण त्याचा एकसारखा लुक प्रेक्षकांना फार आवडला नाही. अजयने बदलत्या काळासोबत स्वत:चं रूप असं बदललं की त्याच्या स्टाईल लोक फॉलो करू लागले. अजय लवकरच 'टोटल धमाल' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नवाब सैफ अली खान त्याकाळी त्याच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असायचा. सुरुवातीच्या काळात सैफ फार कूल लुकमध्ये दिसायचा. त्याची त्यावेळेची हेअर स्टाईल इतकी गाजली होती की, काही तरूणांनी तसेच केस कापणं पसंत केलं होतं. सैफने नेहमीच त्या त्या काळातील चित्रपटाप्रमाणे लुक आणि स्टाईल बदलली आहे. त्यामुळे 90च्या काळापासून ते आजपर्यंत सिनेमांप्रमाणे सैफही बदलत गेला आहे.
त्याकाळापासून ते आत्तापर्यंत अनिल कपूरच्या दिसण्यावरून तुलना करणं चुकीचं ठरेल. पण त्याच्या स्टाईलमध्ये मात्र बराच फरक दिसून येतो. विशेष म्हणजे आजही त्याच्यात तितकीच एनर्जी दिसून येते. 90च्या काळात अनिलच्या स्टाईलवरून थट्टा केली जायची आणि विनोदही केले जायचे. 2004 नंतर त्याने त्याच्या स्टाईलमध्ये अनेक बदल केले. म्हणूनच तो आजही झक्कास दिसतो आहे.