मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'रामायण'च्या सीतेला साकारायची आहे निर्भयाच्या आईची भूमिका, कारण वाचून कराल सॅल्यूट

'रामायण'च्या सीतेला साकारायची आहे निर्भयाच्या आईची भूमिका, कारण वाचून कराल सॅल्यूट

रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी निर्भयाच्या आईची भूमिका साकारायची असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी निर्भयाच्या आईची भूमिका साकारायची असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी निर्भयाच्या आईची भूमिका साकारायची असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 21 एप्रिल : रामानंद सागर यांचा लोकप्रिय शो रामायण लॉकडाऊनमध्ये रि-टेलिकास्ट करण्यात आला आणि शोमधील कलाकारांच्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या. खास करुन या शोमध्ये सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहेत. रामायणात सीतेची भूमिका साकारुन लोकांच्या मनात अद्याप घर करुन राहिलेल्या दीपिका चिखलिया यांनी निर्भयाच्या आईची भूमिका साकारायची असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दीपिका चिखलिया सांगतात, निर्भयाची कथा मला हे प्रकरण समोर आलं त्या दिवसापासून आजपर्यंत त्रास देत आहे. एक स्त्री म्हणून मी निर्भयाची आई आशा देवी यांच्या वेदना आणि त्यांना झालेला त्रास समजू शकते. मला जर संधी मिळाली तर मला निर्भयाची आई आशा देवी यांची भूमिका साकारायला नक्की आवडेल.

Lockdown मध्ये या बॉलिवूड स्टार्सनी आठवले जुने दिवस आणि शेअर केले HOT PHOTOS

नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाल्या, जेव्हाही मी निर्भया प्रकरणाबद्दल विचार करते त्यावेळी भीतीनं अंगावर काटा येतो. या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी तब्बल सात वर्षं लागली आणि या सात वर्षांत आशा देवी आपल्या मुलीसाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यामुळे त्यांची भूमिका खूपच मजबूत वाटते. त्यामुळे जर भविष्यात या प्रकरणावर एखादा सिनेमा आला आणि त्यात मला आशा देवींची भूमिका साकारायला मिळाली तर मला खरंच आनंद वाटेल.

#AskSRK लोकसंख्या वाढविण्यापेक्षा मुलांसोबत खेळतो, चाहत्याच्या प्रश्नांवर शाहरुख

दीपिका पुढे म्हणाल्या, आजही गावातल्या स्त्रीया त्यांच्यावर अन्याय होत असताना देखील तक्रार करायला घाबरतात. त्यांना निर्भया आणि तिच्या आईची कहाणी प्रेरणा देऊ शकते. ही केस बराच काळ चालली. त्यामुळे यावर एखादा सिनेमा तयार झाला तर यातून लोकांमध्ये नक्कीच जागरुकता येईल. खास करुन महिलांना यातून हिम्मत मिळेल.

रितेश देशमुख लॉकडाऊनमुळे लातूरऐवजी अडकला या ठिकाणी, Video मुळे झाला खुलासा

First published:

Tags: Ramayana