जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बाप रे! बेसिनमध्ये भांडी घासताना निघाला जगातला सर्वात विषारी साप, पाहा PHOTO

बाप रे! बेसिनमध्ये भांडी घासताना निघाला जगातला सर्वात विषारी साप, पाहा PHOTO

बाप रे! बेसिनमध्ये भांडी घासताना निघाला जगातला सर्वात विषारी साप, पाहा PHOTO

भांडी घासताना बेसिनमधून अचानक सापानं डोकं वर काढलं पुढे काय झालं वाचा सविस्तर

  • -MIN READ
  • Last Updated :

सिडनी, 08 मे : घरातील बेसिनमध्ये आपण भांडी घासताना समोर झुरळ किंवा साधी पाल आली तरीही आपला जीव अर्धा होतो. आपण खूप घाबरतो, त्यांना घालवण्याचा प्रयत्न करतो. पण नुसती कल्पना करा जर साप समोर आला तर. जिथे सापाला पाहून आपली बोबडी वळते तर तो बेसिनमधून घरात आला तर काय होईल. आपण कल्पना करू शकत नाही पण ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. ऑस्ट्रेलिया इथल्या सिडनीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेसिनमध्ये भांडी घासत असताना सिंकमधून अचानक सापानं डोकं वर काढलं. जेव्हा या सापाची माहिती समोर आली ती भयंकर होती. जगभरातील सर्वात जास्त विषारी दुसऱ्या क्रमांकावर असणारा हा साप बेसिनमधून वर येत असल्याची माहिती समोर आली. मायकेलनं 9 न्यूज दिलेल्या माहितीनुसार सिंकमध्ये उपस्थित असलेल्या सापाबाबत माहिती दिली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्पमित्र आणि सापांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणाऱ्या संस्थेला यासंदर्भात माहिती देण्यात आली.

हे वाचा- चक्क माकडाच्या पिल्लानं चिमुकल्याला फरफटत नेलं, पाहा VIDEO जेव्हा या संस्थेचे कर्मचारी घरी आले तेव्हा या सापाला पाहून कर्मचाऱ्यांचीही बोबडी वळली. ऑस्ट्रेलियामधील सर्वात जास्त विषारी साप म्हणून याची ओळख आहे. पहिल्यांदा या तरुणाला साप आहे हे समजलं नाही. कारण तो आतल्याबाजूनं वेटोळं करून बसला होता. मात्र त्यानं डोकं वर काढल्यावर साप असल्याचं समजलं. सुदैवानं त्याला चावला नाही आणि दुर्घटना झाली नाही पण या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या सिंकमधील सापाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सगळ्यात कमी वयाचा आणि ईस्टर्न ब्राऊन साप हा अधिक विषारी म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये साप चावल्यामुळे मृत्यू झाल्याचं प्रमाण याचं सापाच्या जातीमुळे असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे वाचा- VIDEO दुःखाचे नव्हे, हे अश्रू आनंदाचे; कोविड योद्ध्या महिलेचं झालं अनोखं स्वागत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात